राजधानीचे शहर असलेल्या दिल्ली येथून मुंबईला जाणाऱ्या विमानातील एका प्रवाशाने २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. एका महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. इंडिगो एअर लाईन्सच्या विमानात ही घटना घडली. मुलीच्या तक्रारीनंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. रोहित श्रीवास्तव (वय ४७ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे.
इंडिगो एअरलाईन्सच्या दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानात पाटणा येथे राहणाऱ्या रोहित श्रीवास्तव आणि पीडित मुलीची आसनव्यवस्था बाजूबाजूला होती. बुधवार, २६ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता हे विमान दिल्लीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पण, विमान मुंबईत उतरण्यापूर्वीच आरोपीने मुलीचा विनभंग केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपीने या चुकीच्या हेतून स्पर्श केल्याचे मुलीने म्हटले आहे.
मुलीच्या ही गोष्ट लक्षात आली असता तिने त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. वाद जास्तच वाढल्यावर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, विमानाच्या लँडिंगनंतर अधिकारी या दोघांनाही सहार पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेव्हा आरोपीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. तसेच या मुलीचा जबाबही पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला.
हे ही वाचा:
विकृतीची हद्दपार; आयफोन विकत घेण्यासाठी पोटच्या मुलाला विकलं
महिला अत्याचाराविरोधात केंद्र सरकारचे ‘झिरो टॉलरेंस’ धोरण
टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा उद्योगरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी
‘महामृत्युंजय यंत्र लावणे आणि मंत्र म्हणणे ही अंधश्रद्धा आहे काय?
आरोपीच्या विरोधात कलम ३५४ आणि ३५४- अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, सध्या आरोपीला जामीन मिळाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.