प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला ‘उद्योगरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत यासंबंधी माहिती दिली. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारने ‘महाराष्ट्र उद्योगरत्न’ पुरस्कार जाहीर केला असून, पहिलाच पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कला, क्रीडा, साहित्य आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या विशेष कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
उद्योगरत्न पुरस्काराबरोबरच युवा उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजकासाठी आणखी तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र, या सर्व पुरस्कारांचे नेमके स्वरूप आणि ते कधी प्रदान करण्यात येणार आहेत, याबाबतचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
रतन टाटा हे टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी २००० साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना अनेक देशांनी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांना इतरही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
हे ही वाचा:
‘महामृत्युंजय यंत्र लावणे आणि मंत्र म्हणणे ही अंधश्रद्धा आहे काय?
आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये
पुण्यातून संशयित दहशतवाद्याला उचलले; आयसीस मॉड्युल प्रकरणात पाचवी अटक
आयएनएस विक्रांतवर सापडला १९ वर्षीय खलाशाचा मृतदेह; आत्महत्येचा संशय
रतन टाटांच्या आयुष्यावर चित्रपट येणार
देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगरा या रतन टाटा यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर रतन टाटा यांचे आयुष्य मांडण्यात येणार आहे.