25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियायूएफओ, ‘मानव नसलेली शरीरे' अमेरिकन सरकारच्या ताब्यात?

यूएफओ, ‘मानव नसलेली शरीरे’ अमेरिकन सरकारच्या ताब्यात?

माजी अमेरिकी अधिकाऱ्याचा दावा

Google News Follow

Related

अमेरिकन सरकारच्या ताब्यात यूएफओ आणि गैर-मानवी शरीरे आहेत, असा खळबळजनक दावा अमेरिकेच्या माजी गुप्तचर अधिकाऱ्याने शपथेवर केला आहे.

 

अमेरिकेचे माजी गुप्तचर अधिकारी डेव्हिड ग्रुश यांनी बुधवारी सांगितले की, यूएफओ आणि मानवेतर शरीरे अमेरिकी सरकारच्या ताब्यात आहेत. ग्रुश यांनी वॉशिंग्टनमधील हाऊस निरीक्षण समितीसमोर शपथेखाली हे विधान केले. यूएस सरकार ‘एलियन स्पेसक्राफ्ट’ला आश्रय देत असल्याचा दावा ग्रुशने जूनमध्ये केल्यावर सुनावणी नियोजित करण्यात आली होती.

 

अमेरिकी सरकारकडे ‘अपघातग्रस्त झालेल्या एलियन स्पेसक्राफ्टचे वैमानिक आहेत का?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अपघातस्थळावरून काही जैविक बाबी सापडल्या. ते मानव नसलेले शरीर होते, असे उत्तर त्यांनी दिले. तसेच, ज्यांना या विषयाबाबत सखोल ज्ञान आहे, अशा तज्ज्ञांनीच त्यांचे मूल्यांकन केले होते, अशी माहितीही ग्रुश यांनी दिली.

 

डेव्हिड ग्रुश यांनी सन २०२३पर्यंत अमेरिकेच्या संरक्षण विभागांतर्गत येणाऱ्या अस्पष्टीकृत विसंगत घटनांच्या (यूएपी) च्या विश्लेषण पथकाचे नेतृत्व केले. त्यांनी जूनमध्ये आरोप केला होता की, सरकार अमेरिकी काँग्रेसपासून अलौकिक लोकांचे पुरावे लपवत आहे. त्याच्या आरोपांमुळे वादळ उठल्यानंतर, रिपब्लिकन-नेतृत्वाखालील निरीक्षण समितीने त्याच्या दाव्यांची चौकशी सुरू केली.

हे ही वाचा:

आयएनएस विक्रांतवर सापडला १९ वर्षीय खलाशाचा मृतदेह; आत्महत्येचा संशय

वाजवा रे वाजवा! आता विवाहसोहळ्यात बॉलीवूड गाण्यांना बंदी नाही

आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये

वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्यांनी केले ५५ लाखांचे नुकसान

 

सुनावणीदरम्यान, ग्रुश यांनी खासदारांना सांगितले की, मानव नसलेली शरीरे सरकारने ताब्यात घेतली आहेत. मात्र त्याने स्वत: कधीही एलियन पाहिले नाहीत, अशी कबुली दिली. तसेच, त्याने ते कथित ‘एलियन स्पेसक्राफ्ट’ही पाहिलेले नाही, असेही स्पष्ट केले. मात्र त्याचे दावे ‘उच्च-स्तरीय गुप्तचर अधिकार्‍यांच्या विस्तृत मुलाखती’वर आधारित आहेत, असे त्याने ठामपणे सांगितले.

 

कोसळलेले यूएफओ जमा करून त्याचे कार्य, यंत्रणा, कोड तपासण्यासाठी अमेरिकी सरकारने काही दशकांचा कार्यक्रमही आखला होता, असा दावा ग्रुश या माजी अधिकाऱ्याने केला. अमेरिकी सरकारने मात्र पुरावा लपवल्याचा ग्रुशचा दावा नाकारला आहे. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने ‘द गार्डियन’ला सांगितले की, पृथ्वीच्या बाह्य भागातील सामग्रीचा ताबा घेण्यासाठी किंवा या स्पेसक्राफ्टची यंत्रणा तपासण्यासंबंधी कोणतेही कार्यक्रम भूतकाळात अस्तित्वात होते किंवा सध्या अस्तित्वात आहेत, या दाव्याला बळ देणारी कोणतीही पडताळणीयोग्य माहिती तपासकर्त्यांना सापडली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा