24 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरदेश दुनियागांग बेपत्ता, वांग यांना नवा पत्ता; चीनचे परराष्ट्रमंत्री

गांग बेपत्ता, वांग यांना नवा पत्ता; चीनचे परराष्ट्रमंत्री

Google News Follow

Related

चीनच्या परराष्ट्रमंत्रीपदी वांय यी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल महिनाभर ‘बेपत्ता’ असलेल्या किन गांग यांची जागा ते घेतील, अशी माहिती सरकारच्या प्रसिद्धीमाध्यमांकडून मंगळवारी देण्यात आली.

 

‘बेपत्ता’ परराष्ट्र मंत्री किन गांग यांना काढून टाकण्यात आले असून वांग यी यांनी त्यांची जागा घेतली आहे. ‘चीनच्या सर्वोच्च विधिमंडळाने एक अधिवेशन बोलावले होते. त्यात वांग यी यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यासाठी मतदान करण्यात आले, ’ असे चीनमधील प्रसारमाध्यम शिन्हुआने म्हटले आहे.

हे ही वाचा:

अबब!! ऍप्पलचे बूट तेही ४० लाखांचे!

मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार !

निधीवाटपात कुणावरही अन्याय झालेला नाही!

आश्चर्याची बाब म्हणजे वांग यी यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली असतानाही अद्याप गँग यांचा ठावठिकाणा कळलेला नाही. ते अखेरचे दिसले होते, २५ जून रोजी. तेव्हा त्यांनी चीनच्या भेटीवर असणार्‍या रशियन, श्रीलंकन आणि व्हिएतनामी अधिकार्‍यांशी चर्चा केली होती. तेव्हापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. त्यांच्या मंत्रालयाने ते प्रकृतीच्या कारणास्तव ते काम करत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

 

जवळपास एक महिना उलटूनही ते अद्याप बेपत्ता असून आणि चीनने याबाबत मौन धारण केले आहे. त्याच्या अनुपस्थितीबद्दलची चर्चा चिनी सोशल मीडिया साइट वीबोवर उघडपणे सेन्सॉर करण्यात आली होती. या सोशल मीडियावर ‘कुठे आहे किन गँग’ असा सर्च दिला असता, काहीही दिसत नव्हते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा