हवाईसुंदरी गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले हरयाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडा व सहआरोपी अरुणा चढ्ढा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.
गीतिका शर्मा यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप कांडा यांच्यावर होता. पण मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विकास धुल यांनी या दोघांनाही निर्दोष मुक्त केले. पुरावे नष्ट करणे, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला होता. न्यायालयाने बलात्कार आणि अनैसर्गिक संभोग याचेही आरोप कांडा यांच्यावर ठेवले आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधानांचा घणाघात; इस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिदीननेही ‘इंडिया’ शब्द वापरला!
ब्रदीनाथ महामार्ग वाहून गेल्याने १००० यात्री अडकले
मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज चव्हाण यांची ५ तास चौकशी
महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थानचा क्रमांक पहिला
कांडा यांच्या एमएलडीआर एअरलाइन्समध्ये गीतिका हवाई सुंदरी म्हणून नोकरी करत होत्या. २०१२मध्ये ५ ऑगस्टला त्या मृतावस्थेत आढळल्या. वायव्य दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृतदेह सापडला. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. कांडा आणि चढ्ढा यांच्याकडून आपला छळ झाल्याचा आरोप त्यांनी या चिठ्ठीत केला होता. त्यानंतर कांडा यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. काँग्रेसच्या भूपिंदरसिंग हुडा यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते.
५ ऑगस्टलाच कांडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. ७ ऑगस्टला कांडा यांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. तिथे त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानंतर ८ ऑगस्टला या एअरलाइन्समधील व्यवस्थापक आणि सहआरोपी अरुणा चढ्ढा यांना अटक करण्यात आली. त्याच दिवश पोलिसांनी कांडा यांना फरार घोषित केले. कांडा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा मारला. कांडा यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर कांडा हे स्वतः दिल्लीच्या अशोक विहार पोलिस ठाण्यात हजर झाले.