32 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषन्या. देवेंद्र कुमार उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका हे ३० मे २०२३ रोजी सेवानिवृत्त

Google News Follow

Related

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपतींनी सोमवार २५ जुलै रोजी शिक्कामोर्तब करत अधिसूचना जारी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने काही दिवसांपूर्वी ही शिफारस केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रमेश धनुका हे ३० मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार यांची उच्च न्यायालयाचे प्रभारी असल्याने मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती नितीन जामदार हे सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. दरम्यान, ६ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्या. संजय कौल आणि न्या. संजीव खन्ना यांच्या न्यायवृंदाने न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.

हे ही वाचा:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, दुसरे कुणीही नाही!

मणिपूरमध्ये म्यानमारच्या ७१८ जणांची घुसखोरी?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, दुसरे कुणीही नाही!

दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनाने सुरू होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा

न्यायमूर्ती उपाध्याय यांची २१ नोव्हेंबर २०११ रोजी देशातील सर्वात मोठ्या अशा अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते अलाहाबाद उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्याचबरोबर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे वरीष्ठ न्यायमूर्ती धीरजसिंह ठाकूर यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या, उच्च न्यायालयामध्ये ६६ न्यायाधीश, ४० स्थायी न्यायाधीश आणि २६ अतिरिक्त न्यायाधीश आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा