दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश गौरांग कांत चक्क त्यांचा पाळीव कुत्रा हरवल्याने संतप्त झाले आणि सुरक्षा कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी करू लागले. घराच्या बाहेरील उघड्या गेट्समधून कुत्रा बाहेर पडल्याने तो हरवला.मात्र, न्यायाधीशांनी आपल्या अधिकृत निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांच्या निलंबनाची मागणी केली कारण सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आपला पाळीव कुत्रा हरवल्याचे म्हटले आहे. न्यायमूर्तींनी दिल्ली पोलिसांना विनंती केली की, अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा, कारण त्यांचे वर्तन सरकारी नोकरांप्रती अशोभनीय होते तसेच सखोल चौकशी करण्याचे आदेशही दिले.
घटना कोलकाता येथील आहे. कांत हे उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असून यांची नुकतीच कोलकाता उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती. कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांचा पाळीव कुत्रा हरवल्याने ते संतप्त झाले. त्यांचा राग अनावर झाल्याने त्यांनी दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या अधिकृत निवासस्थानी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे माझा कुत्रा हरवला असून त्यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली होती.
त्या पत्रात असे लिहिले होते की, “मी हे पत्र खूप वेदना आणि दुःखाने लिहित आहे. माझ्या सरकारी बंगल्यात सुरक्षा पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या क्षमतेच्या अभावामुळे मी माझा पाळीव कुत्रा गमावला आहे.” सुरक्षा कर्मचाऱ्यांना वारंवार दरवाजा बंद ठेवण्यास सांगूनही, माझ्या निवासस्थानी नियुक्त सुरक्षा अधिकारी माझ्या निर्देशांचे पालन करण्यात आणि त्यांचे व्यावसायिक कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरल्याने हा प्रसंग उद्भवला असल्याचे पत्रात लिहिले होते. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि अक्षमता याकडे तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. कारण यामुळे माझ्या जीवनाला आणि स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी दिल्ली पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हे ही वाचा:
शेतकऱ्याकडे मोठयाप्रमाणात सापडले स्फोटके आणि दारुगोळे !
पाकिस्तानच्या सीमा हैदरला हवे भारतीय नागरिकत्व !
इर्शाळवाडीतील दरडग्रस्त अनाथ मुलांना डॉ. गोऱ्हे यांनी दिला दिलासा
अपघातातून सावरलेला ऋषभ पंत होतोय तंदुरुस्त
सुरक्षा कर्मचार्यांच्या कर्तव्यात निष्काळजीपणामुळे माझ्या निवासस्थानी कोणतीही अनुचित घटना घडू शकते आणि मला माझ्या सुरक्षेची भीती वाटते. गेटचे व्यवस्थापन न करणे आणि हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात निष्ठा नसणे आणि माझ्या निवासस्थानाच्या गेटमधून प्रवेश करणे आणि बाहेर पडणे असह्य आहे,” असेही ते म्हणाले. कांत यांनी १२ जून रोजी पोलीस सहआयुक्त (सुरक्षा) यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दिल्ली पोलिसांना या अधिकार्यांना ताबडतोब निलंबित करण्याची विनंती केली, कारण त्यांचे वर्तन सरकारी कर्मचार्यांसाठी अशोभनीय होते आणि सखोल तपास करण्याची पत्रात विनंती केली आहे.
घडलेल्या घटनेमुळे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या इच्छेने सांगितले की, कांत यांनी त्यांना गेल्या महिन्यात पत्र लिहिले होते.या पत्राला उत्तर देत पोलीस अधिकाऱ्याने कांत याना सांगितले होते की, त्यांच्या निवासस्थानी तैनात असलेल्या पोलिसांवर आम्ही कोणतीही कारवाई करू इच्छित नाही. भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे जिथे त्यांनी म्हटले आहे की, न्यायाधीशांसाठी उपलब्ध प्रोटोकॉल सुविधा “इतरांना गैरसोय होण्यासाठी किंवा न्यायव्यवस्थेवर सार्वजनिक टीका करण्यासाठी जबाबदार असेल” अशा प्रकारे वापरली जाऊ नये.
या नंतर न्यायमूर्ती गौरांग कांत यांनी त्यांच्या मागणीवरून माघार घेत सुरक्षा कर्मचार्यांवर कारवाई करू नये, असे म्हटले. हरवलेला कुत्रा हा जिवंत आहे का याची अद्याप माहिती कळू शकली नाही.