25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरसंपादकीयमहिला अत्याचाराचे राजकारण करणारे नेते की गिधाडे?

महिला अत्याचाराचे राजकारण करणारे नेते की गिधाडे?

ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये घटना घडली तर त्याचा निषेध होत नाही. अनेकांची तर दातखीळ बसते. तोंडातून शब्द फुटेनासा होतो.

Google News Follow

Related

देशात स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांची आणि चळवळ्यांची जमात मोठी आहे. कधी काळी ही चळवळ होती. रस्त्यावर उतरण्याची धमक असलेली माणसं यांच्यात होती. परंतु आता ही फक्त वळवळ उरलेली आहे. देशात आणि देशाबाहेर घडणाऱ्या घटनांवर एकांगी व्यक्त होणे. निवडक विषय आणि घटनांबाबत संवेदनशील होणे. सोयीच्या नसलेल्या तशाच घटनांवर सोयीस्कर मौन बाळगणे, संवेदनशील विषयांवर राजकारण करून कंड शमवणे हे या जमातीचे वैशिष्ट्य बनले आहे.

 

देशाच्या आत्म्याचा थरकाप उडेल अशी घटना ४ मे रोजी मणिपूरमध्ये घडली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही या घटनेची दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. परंतु तशीच घटना जेव्हा पश्चिम बंगालमध्ये घडते तेव्हा त्याबद्दल पाळले जाणारे मौन संतापजनक आहे. या मौनाचे अनेक अर्थ आहेत. महिला अत्याचार जेव्हा भाजपाच्या राज्यात होतात तेव्हाच त्या निषेधार्ह असतात. परंतु ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये घटना घडली तर त्याचा निषेध होत नाही. अनेकांची तर दातखीळ बसते. तोंडातून शब्द फुटेनासा होतो.

 

 

८ जुलै रोजी प. बंगालच्या पंचायत निवडणुका दरम्यान हावडा जिल्ह्यातील पंचला येथे तृणमूलच्या गुंडांनी एका महिलेला विवस्त्र करून तिची धिंड काढली. या जमावात तृणमूलचा उमेदवार हिमंता रॉय उपस्थित होता. एक महीला मुख्यमंत्री असलेल्या राज्यात हे घडले. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे घडवले. मणिपूरमध्ये जे घडले त्या मागे दोन समाजातील तेढ कारणीभूत होती, परंतु इथे तर सत्ताधाऱ्यांचा वरवंटा चालेलेला आहे. या घटनेचा व्हीडीयो हृदयाचा थरकाप उडवणारा आहे. महीला सॉफ्ट टार्गेट बनल्या आहेत. कोणताही भूभाग पेटला, राजकारण ढवळून निघाले तर त्याच्या झळा सर्वप्रथम महीलांना बसतात. दंगल राजकीय असो वा धार्मिक. महिलांच्या अब्रूवर घाला घातला जातो.

 

 

राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. इथे चार जणांचे गळे चिरण्यात आले. सहा महिन्याच्या बाळाला जिवंत जाळण्यात आले. एकाच कुटुंबातील हे लोक. ज्या चार जणांचे गळे चिरण्यात आले त्यात दोन महिला आहेत. राजस्थान विधिमंडळात मणिपूरमधील महिलांचा निषेध करण्यात आला. तेव्हा अशोक गेहलोत मंत्रिमंडळातील मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी आवाज राज्यात घडलेल्या या घटनेबाबत आवाज उठवला. ‘आपण मणिपूरमधील घटनेचा निषेध करीत आहोत, परंतु आपण आपल्याच राज्यातील महिलांवरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरलो आहोत’, अशी खंत व्यक्त केली. ही भूमिका घेतल्याबद्दल गुढा यांचे खरे तर कौतgक व्हायला हवे होते. परंतु या प्रामाणिकपणाची त्यांना किंमत चुकवावी लागली.

 

 

महिला अत्याचाराच्या घटनांच्या मुळाशी न जाता त्याचा वापर फक्त भाजपा आणि मोदींना ठोकण्यासाठी झाला पाहिजे हे काँग्रेसचे धोरण आहे. त्यांची पुरोगामी पिलावळ त्यांची री ओढण्याचे काम करते. जमेल तेव्हा काँग्रेसची पापं झाकण्याचे धंदेही करते. गुढा यांना त्यांच्या रोखठोकपणाची किंमत चुकवावी लागली. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली.
जेव्हा भाजपा शासित राज्यात अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा तिथे आगीत तेल ओतायला धावणारे राहुल गांधी काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातील पीडितांना दिलासा द्यायला का जात नाहीत?

हे ही वाचा:

रक्तदान शिबिराने सुरू झाला सेवासप्ताह

कुटुंब रंगलंय गप्पात! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कुटुंबाची पंतप्रधान मोदींनी केले आस्थेवाईक चौकशी

जेजुरीच्या खंडोबा मंदिरात उधळली जाणारी हळद ‘सेंद्रिय’ असावी!

‘आदेश नसतानाही यासिन मलिकला न्यायालयात का आणले?’

 

महाराष्ट्र विधानसभेत मणिपूरबाबत तावातावाने बोलणाऱ्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे आम्हाला कौतुक वाटले, परंतु त्यांना राजस्थान आणि प.बंगालमधल्या महिलांबाबत हळहळ का वाटत नाही? तिथल्या अत्याचाराबाबत संताप का येत नाही? संजय राऊत यांच्यासह शिउबाठाचे तमाम नेते थेट पंतप्रधानांना सवाल विचारतात, ही मंडळी आपल्या मित्र पक्षांना जाब विचारत नाहीत? महिला अत्याचारासारख्या गंभीर विषयांचे राजकारण करणारी गिधाडं आहेत. त्यांना महिलांच्या अब्रूशी घेणे देणे नाही, त्यांना फक्त भाजपाविरोधाचा कंड शमवायचा आहे.

 

 

मणिपूर, उत्तर प्रदेशमध्ये घटना घडली तर संतापणारे आणि प.बंगाल व राजस्थानबाबत मौन बाळगणारे विकृत म्हणावे लागतील. एका प्रदेशात महिलांच्या अब्रुवर घाला घातला गेला तर ओरडा करायचा आणि दुसऱ्या प्रदेशात झाले तर तोंडात मळी भरल्यासारखे गप्प बसायचे ही माणूसकी असू शकत नाही? प्रदेश कोणताही असो महिलेची अब्रू ही अब्रूच असते.
त्यामुळेच ममता बॅनर्जी यांचे तोंड काळे होईल म्हणून प.बंगालबाबत मौन बाळगणारे लोक जोड्याने मारण्याच्या लायकीचे आहेत.

 

 

राजस्थान आणि प.बंगालमधील पिडीत हिंदू असल्यामुळे त्याची दखल घेण्याची गरज अनेक राजकीय पक्षांना वाटणार नाही. परंतु महीला म्हणून तरी त्यांना न्यायासाठी पक्ष बाजूला ठेवून त्यांनी आवाज उठवायला हवा आणि आपले माणूसपण जपायला हवे. यशोमती ठाकूर आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांना हे जमेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. राजकारण बाजूला ठेवून ते स्वत:च्या पक्षाविरुद्ध आवाज उठवून महीलांना न्याय मिळवून देतील, जनता त्यांच्याकडे आशेने पाहते आहे.
मणिपूरमधील घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली. तशीच दखल राजस्थान आणि प.बंगालबाबत घेतली जाईल अशी आम्हाला आशा आहे. राजकारणी गिधाडांसारखे वागू शकतात. न्यायालयाकडून देशाच्या जनतेला अपेक्षा आहेत. न्यायालये पक्षपाती, एकांगी नाहीत, हा जनतेचा विश्वास आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा