27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणरेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले बालासोर अपघाताचे कारण

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले बालासोर अपघाताचे कारण

गेल्या पाच वर्षांत सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याच्या १३ घटना समोर आल्या

Google News Follow

Related

गेल्या महिन्यात २ जून रोजी ओदिशातील बालासोर येथे झालेला तिहेरी रेल्वे अपघात कोणत्या कारणामुळे झाला होता यासंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत राज्यसभेत माहिती देत त्यामागील कारण सांगितले.

हा अपघात सिग्नल-सर्किट-परिवर्तनातील बिघाडामुळे झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. गेल्या पाच वर्षांत सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याच्या १३ घटना समोर आल्या आहेत. मात्र इंटरलॉकिंग सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची एकही घटना घडलेली नाही. बालासोर रेल्वे अपघाताप्रकरणी विविध खासदारांनी माहिती विचारली होती. या प्रश्नांना रेल्वे मंत्र्यांनी लिखित उत्तरे दिली. बालासोर रेल्वे दुर्घटनेत २९५ रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर १७६ जण जखमी झाले होते.

शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस (१२८४१)ने उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. त्यानंतर या एक्स्प्रेसचे डबे लगतच्या रेल्वेरुळांवर पडले आणि उलट दिशेने येणाऱ्या बेंगळूरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसने या डब्यांना धडक दिली. ही घटना सिग्नलिंग सर्किट बदलताना झालेल्या बिघाडामुळे झाल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली. या बिघाडामुळे ट्रेन नंबर १२८४१ला चुकीचा सिग्नल मिळाला.

ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे लूप लाइनला उभ्या असलेल्या मालगाडीला या एक्स्प्रेसने धडक दिली. मात्र ‘गेल्या पाच वर्षांत इंरलॉकिंग सिग्नल यंत्रणेत बिघाडाची एकही दुर्घटना घडलेली नाही. कोणत्याही तज्ज्ञाने या यंत्रणेतील दोष काढलेला नाही,’अशीही स्पष्टोक्ती वैष्णव यांनी दिली.

हे ही वाचा:

यवतमाळमध्ये पुरात ४५ जण अडकले

इर्शाळवाडी दुर्घटना: मृतांची संख्या २२ वर, शोधकार्य सुरू

इर्शाळवाडीमधील अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व एकनाथ शिंदे स्वीकारणार

विराट कोहलीची सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

गेल्या पाच वर्षांत सिग्नल यंत्रणेतील बिघाडाच्या एकूण १३ घटना घडल्या. तसेच, बालासोर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ४१ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. या मृतदेहांना भुवनेश्वरमधील एम्स रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. तर, त्यांचे डीएनए नमुने दिल्लीच्या तपास संस्थांकडे पाठवण्यात आले आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना १० लाख रुपये, जबर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपये तर, प्रत्येक प्रवाशाला ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा