30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाशांतता राखा... मणिपूरमधील वेदनादायी घटनांनंतर आवाहन

शांतता राखा… मणिपूरमधील वेदनादायी घटनांनंतर आवाहन

Google News Follow

Related

मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असताना राज्याच्या तणावात आणखी भर पडली आहे. दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ बुधवार, १९ जुलै रोजी व्हायरल झाला. देशभरातून या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेच्या व्हिडीओनंतर संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी आता सर्व स्तरांमधून प्रतिक्रिया येत असून शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लोकसभेचे माजी उपसभापती कारिया मुंडा यांच्याकडून शांततेचे आवाहन

१५ व्या लोकसभेचे उपसभापती कारिया मुंडा यांनी या प्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे. ३ मे २०२३ पासून सुरू झालेला मणिपूरमधील मैतेई आणि कुकी यांच्यातील हिंसक संघर्ष हा केवळ मणिपूरसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर ५० हजारांहून अधिक लोक त्यांच्या घरातून विस्थापित झाले आहेत. दोन समुदायांमधील विश्वासाचे नुकसान हे कष्टाने कमावलेल्या मालमत्तेच्या नुकसानापेक्षा भयंकर आहे. शांतता आणि सामान्यता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अद्याप फलदायी झालेले नाहीत.

एकमेकांमधील विश्वास शांतता आणि सामान्यतेच्या पायावर बांधला जातो. मणिपूरमधील प्रत्येकाच्या जीवनातील अशा दुर्दैवी कालावधीच्या कारणांची चर्चा करण्यापेक्षा लोकांच्या जीवनात सामान्यता आणणे अधिक उचित आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

देशातील प्रतिष्ठित प्रामाणिक विश्वासू लोकांनी पुढे येऊन मणिपूरच्या लोकांमध्ये शांतता आणि सामान्यता प्रस्थापित करण्यासाठी सरकारला मदत करावी. अशा कठीण परिस्थितीत देशाचा एक ज्येष्ठ नागरिक म्हणून मी मणिपूरच्या माझ्या बंधू- भगिनींना आवाहन करतो की, मणिपूर आणि संपूर्ण देशाच्या चांगल्या आणि उज्वल भविष्याची आशा ठेवून एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.

पी टी उषा यांच्याकडून मणिपूरच्या नागरिकांचे हासू पुन्हा आणण्याची प्रतिज्ञा

कोट्यवधी भारतीयांच्या बलिदानाने आपले महान राष्ट्र, भारताने आपले स्वातंत्र्य मिळवले. देशात विविध जातीचे लोक, धर्म आणि भाषा यासह एकोप्याने राहतात आणि आत्मविश्वासाच्या या नव्या युगात एकत्र प्रगती करतात. विकासाच्या वाटेवर आपण एक आहोत, आपण भारतीय आहोत.

‘ऍथलीट’ म्हणून माझी कारकीर्द आणि माझी विनम्र कामगिरी सर्वांनी साजरी केली. याच भावनेने सांगत आहे की, मणिपुरी नागरिक हा माझा माझा मित्र आणि सहकारी आहे. माझ्या ऍथलेटिक कारकिर्दीत, मी माझ्यासारख्या अत्यंत कुशल आणि मेहनती मणिपुरींना पाहिले आहे. मेरी कोम, कुंजराणी देवी, सरिता देवी, मीराबाई चानू अशा अनेकांची नावे पी टी उषा यांनी घेतली.

त्यांचे विजय आणि यश लाखो भारतीयांना प्रेरणा देतात. आज आपण जे काही आहोत, मग ते क्रीडा असो, विज्ञान असो, कला असो किंवा विकास असो ते आपल्या एकतेतून आले आहे. सहिष्णुता, बंधुता आणि एकजुटीच्या लोकशाही भावनेने मजबूत केले. त्यामुळे आज आपण प्रतिज्ञा करूया की, आपण ते हसू हृदयात आणि मनात परत आणूया. प्रिय मणिपूर, चला एकत्र बरे होऊ या, एकत्र प्रगती करूया आणि चांगल्या भविष्यासाठी आशा आणि सुसंवादाने नवीन दिवस सुरू होऊ द्या, असे म्हणत त्यांनी शांततेचे आवाहन केले आहे.

मणिपूरमधील हिंसा थांबवायला मध्यस्ती करायला तयार

मणिपूरमध्ये अनेकवेळा जाण्याचा योग आला. मात्र, सध्याचे मणिपूरमधील संकट हे वेदनादायी आहे. दोन समाजांमधील आपापसातील ही खोल दरी आहे. यापूर्वीच ही येऊ घातलेली फूट मला जाणवली होती. मणिपूरच्या सर्व जनतेला हिंसाचारापासून दूर राहण्याचे कळकळीचे आवाहन आहे. हिंसा कुठेही नेणार नाही. ते समृद्धी आणणार नाही लोकांचे झालेले नुकसान आणि दोन्ही बाजूंच्या मालमत्तेचा नाश आपल्याला फक्त मागे घेऊन जाईल. माझ्याशी संपर्क साधा, मी मध्यस्थी करण्यास तयार आहे. संवादातून निराकरण करू शकत नाही असे काहीही नाही. आपण एकत्र बसून चर्चा करूया, असे आवाहन गुरुदेव श्री श्री रवी शंकर यांनी केले आहे.

हे ही वाचा:

विनेश, बजरंगच्या निवडीविरोधात खेळाडू, पालकांचे आंदोलन

जैन साधूंच्या निघृण हत्याकांडा विरोधात विशाल मौन रॅलीचे आयोजन !

भारत वेस्ट इंडिज शतकी कसोटी, कोहली ५००

मणिपूर: महिलांची नग्न धिंड प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक !

मणिपूरच्या लोकांनी ताबडतोब हिंसक मार्ग सोडावा

मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनेबद्दल खूप वेदना होत आहेत. मणिपूर राज्य हे आपल्या देशाचा एक अविभाजित भाग आहे. भारतामध्ये घडामोडी घडू नयेत. आपण जगाला अहिंसा मंत्र प्रभावीपणे शिकवला. तो अपमानच आहे. या हिंसाचारातून आपण काय साध्य करणार आहोत. भावी पिढीला काय संदेश देणार आहोत. हे पुढे निरर्थक ठरेल. इतर कोणीतरी याचा फायदा घेण्याचा विचार करू शकतो. त्यामुळे मणिपूरच्या लोकांनी ताबडतोब हिंसक मार्ग सोडला पाहिजे. आपले मतभेद हेच इतरांची ताकद बनतात. हे समजून घेऊन सर्वांनी एकत्रितपणे हितासाठी पावले टाकूया, असे आवाहन जगद्गुरू श्री माधवाचार्य संस्थान याचे श्री श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामी यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा