पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा आग्रह धरणे योग्य असले तरी पीओपीच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मुर्तीकारांच्या पोटावर पाय देऊ नका, मुंबई महापालिकेने हिंदू सणात विघ्न आणणारे धाडसत्र थांबावावे, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली आहे.
मुंबई महापालिकेने यंदाच्या वर्षी गणेशोत्सवातील मुर्तींबाबत कडक निर्बंध घातले आहेत. घरगुती गणेशमूर्ती चार फुटांच्या असाव्यात, त्या शाडू मातीच्याच असाव्यात, असे सांगण्यात आले आहे. तसेच या निर्बंधांची अंमलबजावणी करताना पालिका धाड सत्र सुरू करणार आहे. याबाबत विधानसभेत आमदार आशिष शेलार यांनी औचित्याचा मुद्दा मांडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
मुर्ती पर्यावरणपुरक असावी हा आग्रह धरायला हरकत नाही. म्हणून एकाकी पीओपीच्या मुर्ती बनविणाऱ्यांंच्या पोटावर पाय देऊ नये. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. तसेच मुर्तीकारांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. याबाबत निर्णय येणे बाकी असताना मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारु नये.
हे ही वाचा:
संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर अटकेत
मणिपूरच्या घटनेमुळे मोदी संतापले
इर्शाळवाडी दुर्घटना: मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांचे ऑन फिल्ड उपस्थित राहून लक्ष
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त जखमींची अदिती तटकरेंनी घेतली भेट
या व्यवसायावर हजारो जणांचे पोट अवलंबून आहे. हजारो कोटींची उलाढाल या व्यवसायात होते. त्यामुळे एकाकी त्यावर निर्बंध आणले तर मराठी व्यावसायिक उध्वस्त होतील. हा हिंदूचा सण आहे. धाडसत्र, मुर्ती जप्त करणे अशी विघ्न पालिकेने आणू नये, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.