26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरक्राईमनामामणिपूरमधील क्रूरता; दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार

मणिपूरमधील क्रूरता; दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार

अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल

Google News Follow

Related

मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असताना राज्याच्या तणावात आणखी भर पडली आहे. दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडीओ बुधवार, १९ जुलै रोजी व्हायरल झाला. देशभरातून या घटनेबाबत संताप व्यक्त होत आहे.

मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ आणि ही घटना ४ मे २०२३ रोजीची आहे. मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं आहे.

पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी या व्हायरल व्हिडीओबाबत निवेदन जारी केलं आहे. “दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून राज्य पोलीस दल आरोपींना लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा:

बचावकार्यासाठी जाताना अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू

दरड कोसळून गाव भुईसपाट

तर अमित शहांच्या बाजूला उद्धव ठाकरे असते…

भारत- पाकिस्तान लढत २ सप्टेंबरला

मणिपूर पोलिसांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेची माहिती देताना सांगितलं की, “काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत असून राज्य सरकार आणि केंद्रीय दलाकडून शोध मोहिम सुरू आहे. इंफाळमध्ये दोन शस्त्रास्त्रांसह दोन मॅगेझिन जप्त करण्यात आले आहेत.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा