भाजपाचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत असून यासंदर्भात उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. मुंबई गुन्हे शाखा युनिट १० व्हिडिओच्या सत्यतेचा तपास करणार आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी तांत्रिक तज्ज्ञ आणि सायबर टीमची मदत घेणार आहेत.
सोमवारी रात्री या प्रकरणाचा व्हीडिओ एका वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. स्वतः किरीट सोमय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची चौकशी व्हावी अशी मागणी केली. आपण कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, असेही त्यांनी आपल्या या पत्रात म्हटलेले आहे. त्यानंतर मंगळवारी हा विषय विधानसभेत, विधानपरिषदेत गाजला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी यासंदर्भातील आणखी एक पेन ड्राइव्ह सभागृहाला सादर केले आणि कारवाईची मागणी केली. त्यानंतर फडणवीसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असेही ते म्हणाले. स्वतः उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही यासंदर्भात महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावे अशी विनंती केली.
हे ही वाचा:
भारत सर्वाधिक पाच जीडीपी असणाऱ्या देशांच्या पंक्तीत
किरीट सोमय्यांवर सीडी अस्त्राचा प्रयोग…
छोटा शकीलचे आर्थिक व्यवहार संभाळणाऱ्या आरिफ भाईजानची संपत्ती जप्त
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरूवात
त्यानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. या वृत्तवाहिनीवर हा व्हीडिओ दाखविण्यात आला. तो या वाहिनीला कुणी दिला, त्यामागील उद्देश काय हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.