भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या व्हिडीओवर राजकीय वर्तुळातून आरोप- प्रत्यारोप होत असताना किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र लिहीत कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडिओची सत्यता तपासून घ्यावी अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे.
किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ एका मराठी वृत्त वाहिनीने समोर आणला. दरम्यान, या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहीलं आहे. तसेच कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
पत्रात काय?
“सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले. अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे.”
हे ही वाचा:
कोविड घोटाळ्याप्रकरणी एसआयटीकडून मुंबई महापालिकेत चौकशी
वैमानिक अत्यवस्थ झाल्यानंतर महिला प्रवाशाने उतरविले विमान
भारत इंडोनेशियात आता डिजिटल तंत्रज्ञान व्यवहार
नोव्हाक जोकोविचची मक्तेदारी संपुष्टात आणत कार्लोस अल्कराझ विम्बल्डन विजेता
“मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, हे या ठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी अशी विनंती करत आहे.”
एका वृत्तवाहिनीवर माझी व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, अशा अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहे, अनेक महिलांच्या तक्रारी आहेत असे दावे केले जात आहे
माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार झालेला नाही
अशा आरोपांची व्हिडिओची सत्यता तपासावी चौकशी करावी @Dev_Fadnavis यांना विनंति pic.twitter.com/Q1YLoP0ZUi— Kirit Somaiya (@KiritSomaiya) July 18, 2023