तुम्ही चांगली कामे केलीत तरी लोकांच्या पोटात दुखते. लाभ दिला तरी पोटात दुखते. प्रश्नचिन्ह तयार करता की शासन आपल्या दारी कशाकरिता. लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात, लोक लाभ घेऊन जातात तर पोटात दुखण्याचे कारण काय आता पोट दुखलं तर काळजी नको. पोटदुखीवर औषध देण्यासाठी डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. नाशिक येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
फडणवीस म्हणाले की, शिंदेंचे औषध त्यांच्या पचनी पडले नाही तरी अजितदादा आहेत. त्यामुळे सगळ्यांची पोटदुखी आहे ती त्याच्यावर उपचार करणार आहोत. जनकल्याणाचे कार्य करताना एक वर्ष सरकारला पूर्ण झालं पहिल्याच वर्षात महाराष्ट्राला गुंतवणुकीत देशात पहिल्याच क्रमांकावर आणण्याचं काम महायुती सरकारने केले. या सरकारवर जनतेचा विश्वास आहे. उद्योगजगताचा विश्वास महाराष्ट्रावर आहे. उद्योगात नंबर वन आहोत. शेतकऱ्यांच्या योजना मार्गावर लागल्या आहेत.
फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले. ते म्हणाले की, आधीच्या मुख्यमंत्र्यांचं वाक्य आठवतं. ते म्हणत मला सहकारातलं कळत नाही, मला अर्थशास्त्रातलं कळत नाही, मला शेतीतले कळत नाही, शेवटी पवारांनी पुस्तक लिहिलं त्यांना राजकारणातलंही काही कळत नाही. पण आता असे राहिलेले नाही. राजकारणातलं आम्हाला कळतं, अर्थसंकल्प आणि सहकार आणि शेतीतलंही माहीत आहे. आता जे निर्णय होती ते सामान्य माणसाच्या हिताचे होतील.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला अतिशय कणखर नेतृत्व लाभलं
सचिन तेंडुलकर करत असलेली जुगाराची जाहिरात बंद करा
बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निर्णय घेतला १ रुपयात विमा देतोय. ऐतिहासिक निर्णय रजिस्ट्रेशन करायचं सरकार त्याच्या पाठीशी उभे राहील. मदत देईल. फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांना ६ हजार देत आहे. महाराष्ट्र सरकार शेतकरी सन्मान योजनेतून आणखी ६ हजार असे एकूण १२ हजार देणार आहोत. शेतकऱ्यांची मागणी असते दिवसा वीज द्या. दिवसा १२ तास अखंडित वीज द्या. आता आपण मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना आणली. आश्वस्त करतो ३ वर्षांत नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक दिवशी प्रत्येक शेतकऱ्यला १२ तास वीज मिळेल. १५ ऑगस्टपर्यंत टेंडर काढतो आहोत.