29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामासमाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा

पंतप्रधान मोदी, योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल केलेली आक्षेपार्ह वक्तव्य भोवली

Google News Follow

Related

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी मोठा झटका बसला आहे. या प्रकरणी रामपूरच्या खासदार- आमदार न्यायालयाने (एमपी एमएलए न्यायालय) आझम खान यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामपूरचे तत्कालीन डीएम आणि इतर अधिकार्‍यांवर प्रक्षोभक टिप्पणी केली होती. पुढे आझम खान यांच्यावर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रामपूरमधील शहजाद नगर पोलीस ठाण्यात लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १७१- जी, ५०५ (१) (ब) आणि १२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर आज न्यायालयाने आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तत्कालीन व्हीडिओ सर्व्हिलन्स टीमचे प्रभारी (एसडीओ) अनिल कुमार चौहान यांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होती. शिवाय त्यांनी केलेली विधानं सोशल मीडियात व्हायरल झालेली होती.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी बुर्ज खलिफा तिरंग्याने उजळला

रशिया-युक्रेन यांच्यात शांततेसाठी पुढाकार घेण्यास तयार

कॅनडामधील भगवत गीता पार्कमध्ये फुटीरवाद्यांकडून तोडफोड

चांद्रयान-३ च्या यशस्वी भरारीत महाराष्ट्राचा मोलाचा वाटा!

हे प्रकरण २०१९ मधील असून लोकसभा निवडणुकीत शहजाद नगर पोलिस स्टेशन परिसरातील धामोरा येथे आझम खान यांच्या जाहीर सभेचा व्हिडिओ समोर आला होता. या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष एकत्र लढले होते. त्यावेळी आझम खान रामपूर लोकसभा मतदारसंघातून सपा- बसपा युतीचे उमेदवार होते. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एडीओ पंचायत अनिल चौहान यांनी आझम खानविरोधात शहजाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा