29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषकुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू !

कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू !

आतापर्यंत आठ चित्ते मृत्युमुखी

Google News Follow

Related

मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कच्या हद्दीत आणखी एक चित्ता मृतावस्थेत आढळून आला.१७ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनचा हा आठवा चित्त्याचा मृत्यू आहे. त्यामुळे भारतातील महत्त्वाकांक्षी चित्ता प्रोजेक्टला मोठा धक्का बसला आहे.’सूरज’ नावाचा नर दक्षिण आफ्रिकन चित्ताचा मृतदेह शुक्रवारी पहाटे गस्ती पथकाने शोधून काढला.सूरज चित्त्याला मृत पाहून प्रकल्पाशी संबंधित सर्व अधिकारी हादरले आहेत. तेजस नावाच्या चित्त्याचा गूढ मृत्यूच्या पाठोपाठ ही घटना घडली आहे.

या आधी मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये ठेवलेल्या तेजस या चित्ताचा मंगळवारी मृत्यू झाला. तेजसच्या आधी उद्यानात तीन चित्ते आणि तीन शावकांना जीव गमवावा लागला आहे.त्यानंतर आता ‘सूरज’ नावाच्या नर चित्त्याचा मृत्यू झाल्याने प्रश्न उपस्थित होत आहे.मृत सुरज चित्त्याचा शवविच्छेदन अहवाल प्रलंबित आहे, अधिकारी सूरजच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.या पूर्वी मृत पावलेला सातवा नर चित्ता म्हणजे तेजस.साडेपाच वर्षांच्या कोवळ्या वयात ‘आघातक शॉक’ला तेजस बळी पडला होता.

हे ही वाचा:

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस

लखनऊच्या या ‘रॉकेट वूमन’कडे चांद्रयान ३ ची जबाबदारी

बंद दाराआड झालेल्या गोष्टी ठाकरेंच्या आग्रहाखातर रश्मी वहिनींना सांगाव्या लागल्या

मोदी यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान

त्याचे वजन फक्त ४३ किलो होते, जे समान वयाच्या चित्त्यांच्या सरासरी वजनाच्या ५५-६० किलोपेक्षा कमी होते. शिवाय, तेजसचे अंतर्गत अवयव गंभीर स्थितीत असल्याचे आढळून आले होते.तेजसचे वजन सरासरी नर चित्तापेक्षा खूपच कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले होते. डॉक्टरांनी तेजसची तपासणी केली तेव्हा त्याच्या मानेच्या मागील बाजूस वरवरच्या बाह्य जखमा आढळल्या होत्या,जखमा गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.तेजसला बेशुद्धावस्थेत उपचार करण्याची परवानगी मिळाल्यानंतर डॉक्टरांचे पथक तयारीनिशी मौकरला रवाना झाले.

त्यानंतर नर चित्ता तेजस हा दुपारी दोनच्या सुमारास घटनास्थळी मृतावस्थेत आढळून आला. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या मृत्यूच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे या प्राण्याच्या कल्याण आणि संवर्धनाच्या प्रयत्नांबद्दल चिंता निर्माण होते. भारतीय वाळवंटात चित्ता पुन्हा आणण्याचे प्रोजेक्ट टायगरचे उद्दिष्ट आता या लुप्तप्राय प्रजातींची सुरक्षितता आणि अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी तीव्र तपासणी आणि त्वरित पुनर्मूल्यांकनास सामोरे जात आहे.भारतातील नामशेष झालेल्या चित्तांचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना (५ मादी आणि ३ नर) कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते आणण्यात आले होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा