रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात अयशस्वी बंडखोरी केल्यानंतर वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन एकतर मरण पावले आहेत किंवा तुरुंगात आहेत, असा दावा अमेरिकेच्या माजी लष्करी अधिकार्याने केला आहे. रशियाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बंडखोरीनंतर पाच दिवसांनी भाडोत्री गटाच्या प्रमुखांची भेट घेतल्याचा दावा केल्यानंतर हे विधान आले आहे. अमेरिकेचे माजी जनरल रॉबर्ट अब्राम्स यांनी एबीसी न्यूजला सांगितले की, कदाचित ही बैठकही आयोजित करण्यात आली होती.
‘आपण प्रीगोझिनला पुन्हा सार्वजनिकपणे पाहू की नाही, याबाबत मला शंका आहे. त्याला एकतर लपवून ठेवले जाईल किंवा तुरुंगात पाठवले जाईल किंवा इतर मार्गाने व्यवहार केला जाईल, परंतु आपण त्याला पुन्हा भेटू शकू, याबाबत मला शंका आहे,’ असे अब्राम्स म्हणाले.
हे ही वाचा:
बंद दाराआड झालेल्या गोष्टी ठाकरेंच्या आग्रहाखातर रश्मी वहिनींना सांगाव्या लागल्या
मोदी यांचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर’ पुरस्काराने सन्मान
…म्हणून जयेश पुजारी तथा शाकिरने गडकरींना मारण्याची धमकी दिली!
विकृतीचा कळस; महिलेवर आठ जणांकडून सामुहिक बलात्कार
प्रिगोझिन अजूनही जिवंत आहे असे वाटते का, असे त्यांना विचारले असता, “मला वैयक्तिकरीत्या तो जिवंत आहे, असे वाटत नाही. जर तो असेल तर तो कुठेतरी तुरुंगात आहे,’ असे ते म्हणाले. या आठवड्याच्या सुरुवातीला, रशियाने सांगितले की, प्रीगोझिन आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली. त्यानंतर प्रीगोझिन यांनी सरकारप्रति असलेली निष्ठा व्यक्त केली.
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, पुतिन आणि प्रीगोझिन यांच्यात २९ जून रोजी तीन तासांची बैठक झाली आणि त्यात केवळ प्रीगोझिनच नाही तर त्याच्या वॅगनर ग्रुपच्या लष्करी कंत्राटदाराचे कमांडरही सहभागी झाले होते. लष्करी नेतृत्व बदलाच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात मॉस्कोला निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या प्रीगोझिनचे बंड अयशस्वी ठरले. पुतिन यांनी या बंडानंतर प्रीगोझिनला देशद्रोही ठरवले. तसेच, बंड करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासनही दिले. मात्र प्रीगोझिनविरुद्ध बंडखोरी केल्याबद्दलचे आरोप नंतर मागे घेण्यात आले.