भारत आणि फ्रान्स यांच्यात ९० हजार कोटींचा संरक्षण करार होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी फ्रान्ससोबतच्या महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. फ्रान्सकडून २६ राफेल- एम विमाने आणि तीन स्कॉर्पिन पाणबुडी विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. फ्रान्स आणि भारताच्या धोरणात्मक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदी यांना नॅशनल बॅस्टिल डे परेडसाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. या दौऱ्यावर भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंधि अधिक दृढ बनवण्यावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी सहाव्यांदा फ्रान्स दौऱ्यावर आहेत. फ्रान्स दौऱ्यावेळी पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्ससोबत ९० हजार कोटींच्या संरक्षण क्षेत्रासंबंधित करार होणार आहेत.
या संरक्षण करारांतर्गत भारताला २२ सिंगल सीट राफेल मरीन लढाऊ विमाने मिळण्याची अपेक्षा आहे. ही लढाऊ विमाने आयएनएस विक्रांतवर तैनात करण्यात येतील. त्याचबरोबर चार ट्रेनर राफेल मरीन विमाने उपलब्ध होणार आहेत. यासोबतच भारतात तीन स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या संयुक्त बांधणीवरही चर्चा होऊ शकते. त्यासोबतच फ्रान्सकडून २६ राफेल- एम ही समुद्री लढाऊ विमाने मिळणार आहेत. त्याशिवाय तीन स्कार्पिन श्रेणीतील पाणबुड्याही भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहेत.
हे ही वाचा:
चांद्रयानच्या यशस्वी उड्डाणासाठी तिरुपतीला साकडे
बच्चू कडू मंत्रिपदाचा दावा सोडणार होते, पण मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे थांबले
आंध्र प्रदेशातून चंद्र प्रदेशात; आज चांद्रयान ३ घेणार झेप
राज्यातील प्रत्येक बालकांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर : महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
इंडो- पॅसिफिक सागरी क्षेत्रात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नौदलाची ताकद वाढवण्यासाठी राफेल विमाने खरेदी करण्यात आले असून लवकरच ही विमानं भारतीय नौदलात सामील होतील. भारतीय नौदल आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर २६ राफेल- एम विमाने तैनात करणार आहे, त्यामुळे शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांना चोख प्रत्युत्तर देता येईल.