टोमॅटोच्या उत्पादनात जगभरात भारताचा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. मात्र असे असूनही भारतातील टोमॅटोच्या किमती अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि दुबईबरोबर जाऊन पोहोचल्या आहेत. केंद्र सरकारने आता स्वस्त दरात टोमॅटो विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकार आंध्र प्रदेश. कर्नाटक आणि महाराष्ट्रामधून टोमॅटोची खरेदी करणार आहे.
कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (एपीईडीए)नुसार भारत चीननंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा टोमॅटोचा उत्पादक आहे. चीन वर्षाला पाच कोटी ६४ लाख २३ हजार ८११ टन टोमॅटोचे उत्पादन करतो. तर, भारत एक कोटी ८३ लाख ९९ हजार टन टोमॅटोचे उत्पादन करतो. जगभरात दरवर्षी १७ कोटी ७१ लाख १८ हजार २४८ टन टोमॅटोचे उत्पादन होते.
प्रचंड उष्मा आणि पावसामुळे टोमॅटोच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भारतातही २० ते ४० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो २५० रुपयांपर्यंत विकला जात आहे.
अमेरिका– वॉलमार्टच्या वेबसाइटवर अर्धा किलो टोमॅटो २५० रुपये किलोने विकले जात आहेत. तर, किरकोळ दुकानांत याच्या किमती २५० ते ३०० रुपये किलो आहेत.
ऑस्ट्रेलिया– मेलबर्नमध्ये एका आठवड्यापूर्वी टोमॅटो भारतीय रुपयांच्या किमतीत ५५० रुपयांना मिळत होते. आता ते २२० रुपये प्रति किलो दराने मिळत आहेत.
दुबई– दुबईत एक किलो टोमॅटो १०० पासून १५० रुपयांपर्यंत मिळत आहेत.
फ्रान्स– ‘पॅरिस स्कूल ऑफ बिझनेस’नुसार, फ्रान्सच्या शहरात एक किलो टोमॅटो २४४ रुपयांना विकले जात आहेत. तर, टोमॅटोची सरासरी किंमत ७४ रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत आहे.
चीन- चीनमध्ये एक किलो टोमॅटो ३० रुपयांपासून ३०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.
हे ही वाचा:
रोहित शर्मा, यशस्वीमुळे भारताची सामन्यावर पकड
ठाणे गुन्हे शाखेकडून मोठा शस्त्रसाठा जप्त, एक अटकेत