27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरसंपादकीयतुडवावा चिखल, उडवावा चिखल, फासावा चिखल चोहीकडे....

तुडवावा चिखल, उडवावा चिखल, फासावा चिखल चोहीकडे….

उद्धव ठाकरे काहीही अचकट विचकट बोलले तरी माध्यमांना ती धडाडणारी तोफ का वाटते? कोणी त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले की, त्याच्यावर मात्र जीभ घसरल्याचा ठपका येतो.

Google News Follow

Related

लोकांना हा प्रश्न कायम पडतो की, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे काहीही अचकट विचकट बोलले, फालतू कोट्या केल्या तरी माध्यमांना ती धडाडणारी तोफ का वाटते? कोणी त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले की, त्याच्यावर मात्र जीभ घसरल्याचा ठपका येतो. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंवर केलेले आरोप, माध्यमांना झोंबले, परंतु उद्धव ठाकरे त्यावर मौन आहेत. राणे इतके घसरत असून सुद्धा ठाकरे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत नाहीत? त्यांचे समर्थकही तसा प्रयत्न करत नाहीत? लोकांना याचे उत्तर हवे आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरेंवर केलेले आरोप गंभीर आहेत. गुन्हेगारी स्वरुपाचे आहेत. चारित्र्यहनन करणारे आहेत. या आरोपांचे उत्तर देणे ठाकरेंना प्रतिष्ठेला कमीपणा आणणारे वाटत असेल तर पक्षाच्या नेत्यांनी तरी यावर तोंड उघडायला हवे.

दिशा सालियनच्या हत्येशी भाजपा आमदार नितेश राणे कायम आदित्य ठाकरे यांचा संबंध जोडतात. त्यांचे लहान मुलांशी काय संबंध आहेत? असा सवाल करतात. हा लहान मुलांचा मामला लोकांच्या मनात भलभलते संशय निर्माण करणारा आहे. हा आरोप बलात्काराच्या आरोपा इतकाच घृणास्पद आहे. पण तरीही त्यावर मौन बाळगले जाते. नितेश राणेंनी इतके गंभीर आरोप का केले? नेहमीपेक्षा जाळ का बोलले?

पक्ष प्रमुखांच्या विदर्भ दौऱ्यातील मुक्ताफळं याला कारणीभूत आहेत. दौऱ्यावर जाण्याआधीच ‘उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार’, असे मथळे सजवून माध्यमांनी हवा भरली होती. बिनबुडाचे आरोप आणि अचकट विचकट कोट्यांना धडाडणाऱ्या तोफांची उपमा देऊन माध्यमांनी वारंवार स्वत:ची लायकी सिद्ध केली आहे. अशा तोफांनी गडाचा बुरूज काय, गढीच्या भिंतीचा टवका सुद्धा उडणार नाही. या तोफांनीच ठाकरेंच्या पक्षाचा बाजार उठवला आहे. सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रचंड सैरभैर झाले आहेत. मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत वसूलीबाज सचिन वाजेला मांडीवर घेऊन बसलेले ठाकरे, कोविडच्या काळात दोन्ही हातांनी भ्रष्टाचाराचे लोणी ओरपणारे ठाकरे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्यांना सवाल विचारतात तेव्हा आश्चर्य वाटते.

अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या भाजपाने त्यांना आता मंत्रिमंडळात घेतले. आधी एखाद्याला कलंकीत करतात, बदनाम करतात मग मंत्रिमंडळात घेऊन पावन करतात, असा आरोप करण्याचा अधिकार शरद पवार यांच्या कडेवर बसणाऱ्यांना आहे का? उद्धव ठाकरे शरद पवारांच्या विरोधात काय काय बोलले त्याचा त्यांना विसर पडला असेल कदाचित, पण ते सगळं आंतरजालावर आजही उपलब्ध आहे. जर उद्धव ठाकरे थोरल्या पवारांना खांद्यावर घेऊन नाचू शकतात, तर भाजपा अजित पवारांना सोबत घेऊन बळ का वाढवू शकत नाही?

भाजपाकडे दोन पर्याय होते. वाईट आणि कमी वाईट यात भाजपाने कमी वाईटाचा पर्याय स्वीकारला. महाराष्ट्राच्या राजकारणात शिउबाठा, शरद पवार, एमआयएम आणि काँग्रेसशिवाय कोणताही पर्याय हा भाजपासाठी चांगला पर्याय होता.

ठाकरे जर राजकारण करत असतील तर देवेंद फडणवीसांनी काय कायम सिद्धांत आणि मूल्य कुरवाळत १०६ आमदारांना घेऊन विरोधात बसायचं? २०१९ च्या निवडणुकीत नापास झालेले तिघे आपल्या गुणांची टोटल मारून काठावर पास झाले आणि शंभरावर जागा मिळवलेल्या भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले. शेवटी सगळा खेळ जर संख्या बळानेच सुटणार आहे, तर ती संख्या ठाकरेंच्या पाठीशी उभी न राहाता आपल्या पाठीशी उभी राहील असा प्रयत्न भाजपाने केला तर त्यात चूक ते काय?

तुम्ही दाऊदशी संबंधित लोकांना मंत्रिमंडळात ठेवले होते. तुमच्या काळात गड किल्ल्यावर मजारींचे पेव फुटले. त्यामुळे तुम्हा प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही. तुमच्या घाणेरड्या राजकारणाला फडणवीसांनी चोख उत्तर दिले. तुमच्या स्टाईलमध्ये तुमचे दात घशात घातले तर त्यात एवढा थयथयाट करण्याची गरज काय? तुम्ही राजकारण केले तर समोरचा फक्त हरीभजन करेल अशी अपेक्षा कशासाठी?

हे ही वाचा:

देशभरात अतिवृष्टीमुळे एका दिवसात ५६ जणांनी गमावला प्राण

कलम- ३७० विरोधातील याचिकांवर २ ऑगस्टपासून सुनावणी

पाकमधून आलेल्या सीमा हैदरने सोडली चिकन बिर्यानी, करू लागली तुळशीची पूजा

जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन टॉपला; दहशतवादी संघटनांमधील भर्तीही झाली कमी

मी माझी पर्सनल कामं कधी फडणवीसांना सांगितली नाही, असं तुमचं म्हणणे असेल तर ‘मातोश्री-२’ ही सार्वजनिक मालमत्ता असल्याचे जाहीर करावे, कारण या इमारतीच्या परवानग्या चौकटीबाहेर जाऊन फडणवीसांनीच मंजूर केल्या होत्या. महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याचा हट्टही त्यांनीच पूर्ण केला. राजकारणाचा चिखल भाजपाने केला, असं म्हणत नाकं मुरडायची आणि तोच चिखल दुसऱ्यावर दोन्ही हातांनी फेकायचा, हे कुठले राजकारण?
तुम्ही चिखलफेक केली तर समोरचा तुमच्यावर गुलाबापाणी फेकणार नाही हे नक्की.

नितेश राणे तेच करतायत. परंतु त्यांनी जे आरोप केले आहेत ते भूषणावर नक्कीच नाहीत. आदित्य ठाकरेंचे नाव दिशा सालियनच्या मृत्यूशी जोडतायत, लहान मुलांच्या संदर्भात काही सुचक बोलतायत. पंचोलीच्या घरी लहान मुलांना का बोलवले होते, लहान मुलांचा आणि आदित्य यांचा संबंध काय? हे वारंवार बोलेल जात असताना, त्याच्यावर मौन
बाळगणे संशयाचे धुके निर्माण करणारे आहे.

राणे कुटुंबियांकडे असे अलमारीतील सांगाडे आहेत, की ते काहीही बोलले तरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्यांचे उत्तर देत नाहीत. हलकेच बगल देऊन वेळ मारून नेतात. लोकांनाही आता वाटू लागलंय की या मुद्द्यावर गप्प बसणे ही ठाकरेंची मजबूरी बनली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा