29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणकरोना काळात ६०० रुपयांची बॉडीबॅग ६ हजाराला घेणे म्हणजे कलंक

करोना काळात ६०० रुपयांची बॉडीबॅग ६ हजाराला घेणे म्हणजे कलंक

आमदार अतुल भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Google News Follow

Related

ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना नागपूरला लागलेला कलंक असं म्हणत टीका केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

“दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यूचा तपास न होणे म्हणजे कलंक. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब म्हणणे म्हणजे कलंक. सचिन वाजेसारख्या खुनी पोलीस अधिकाऱ्याची “तो ओसामा बिन लादेन आहे का?” असं म्हणत वकिली करणे म्हणजे कलंक. करोना काळात ६०० रुपयांची बॉडीबॅग ६ हजाराला घेणे म्हणजे कलंक.” असे मुद्दे मांडत अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्यावर झालेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत आठ मुद्दे मांडत उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. “स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!” असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ झाला असावा

गावस्कर रोहित शर्माच्या कप्तानीवर नाराज

१९ बंगल्यांशेजारी ठाकरेंच्या आशीर्वादाने उभारलेल्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडणार

मनीलाँड्रिगचे आरोप असलेले साकेत गोखले तृणमूलचे राज्यसभा उमेदवार

“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? २०१४ साली शिवसेनेनं नाही, तर तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा