30 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणपंधरा दिवस आधीच पवारांच्या ‘राजीनाम्या’चे ठरले होते!

पंधरा दिवस आधीच पवारांच्या ‘राजीनाम्या’चे ठरले होते!

छगन भुजबळांनी केला शरद पवारांविरोधात गौप्यस्फोट

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात येवल्यापासून केली. त्यात त्यांनी छगन भुजबळ यांना लक्ष्य केले. पण त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर देत शरद पवार हेच प्रत्येक गोष्टीचे कर्तेकरविते होते मग मला नेमका दोष कशासाठी ते देत आहेत, असा सवाल भुजबळांनी विचारला आहे. शिवाय, पवारांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून पायउतार होण्याचा जो निर्णय घेतला तो अचानक घेतलेला नाही तर तो १५ दिवस आधीच घेतला गेला होता आणि मग तो जाहीर करण्यात आला, असा मोठा गौप्यस्फोटही भुजबळ यांनी केला आहे.

 

 

नाशिक येथील पत्रकार परिषदेत भुजबळांनी पवारांच्या कथित राजीनाम्याबद्दल गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, अजित पवार आणि शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यात काहीतरी ठऱले होते. १५ दिवसांनंतर मी राजीनामा देणार, असे पवारांचे म्हणणे होते. तसा त्यांनी राजीनामा दिला. पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमादरम्याच तो दिला गेला. पण ३ दिवसांनी राजीनामा निर्णय मागे घेतला. परत निरोप पाठवला की १० तारखेला कार्याध्यक्ष नियुक्त करायचे आहे. सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष करण्यात येणार होते. पवारांनी सांगितले की, तटकरेंना सांगून सर्वांना बोलवा. तेव्हा प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मी उपाध्यक्ष आहे जर सुप्रियांना कार्याध्यक्ष बनविले तर मी तिसऱ्या क्रमांकावर जाईन. हे कसे शक्य आहे?  मग मी सांगितलं की दोघे कार्याध्यक्ष व्हा. अशा पद्धतीने सगळे शरद पवारांनीच केले. आता ते माझ्या विरोधात येवल्यात येऊन सभा घेतात. उलट प्रत्येक गोष्टीत मीच लढत होतो पक्षाच्या वतीने.

 

शरद पवार किती ठिकाणी माफी मागणार?

 

भुजबळ म्हणाले की,  शरद पवारांनी येवल्यात माफी मागितली मी चुकलो म्हणाले. चुकीचा उमेदवार दिला, असे त्यांचे म्हणणे आहे पण शरद पवारांनी मला येवल्यात निवडणूक लढविण्यास सांगितले नाही तर मीच हा मतदारसंघ निवडला. चारवेळा मी इथून निवडून आलो. बारामतीनंतर येवल्याचा विकास झाला असे ते म्हणाले होते. मग तुम्ही माफी का मागितली किती ठिकाणी माफी मागणार ५० ठिकाणी मागणार का? बीड, लातूरपर्यंत माफी मागणार का? मी नेमकी चूक काय केली?

हे ही वाचा:

दिल्ली बुडाली; दिल्लीकरांची केजरीवालांवर टीका

आता गुजरातप्रमाणेच महाराष्ट्रातही होणार ‘सायन्स सिटी’ 

संविधानाची गोष्ट कशाला स्वतःची घटना तर आधी पाळा!

संविधानाची गोष्ट कशाला स्वतःची घटना तर आधी पाळा!

हे सगळे तुमच्या घरातूनच झाले नाही का? ६१-६२ वर्षे ज्यांना सांभाळले, ते तर उपमुख्यमंत्रीही आहेत. ते का गेले? दिलीप वळसेंसारखे, दिल्लीत अनेक वर्षांपासून असलेले प्रफुल पटेल का जातात? सोनिया, मोदींसोबत चर्चा करायची तर पटेल यांनाच पवार पाठवत होते. मग ते पण गेले. विचार करा. भुजबळ यांनी पवारांना आरसा दाखवताना ते म्हणाले की, २०१४ला भाजपाने निवडणुकीत शिवसेनेला सोडले. पवार कबूल झाले की शिवसेनेला सोडलंत की काँग्रेसला सोडू आणि आमचा सरकारमध्ये प्रवेश होईल. काँग्रेसपासून दूर झालो. शिवसेनेलाही भाजपापासून दूर केले आणि निवडणूक लढविली. मग बाहेरून पाठिंबा दिला. मग पुन्हा फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेत घेतले. मी तर या चर्चेत नव्हतो. या चर्चा प्रफुल पटेल, अजित, पवारसाहेब हेच करत होते. अजितदादा म्हणाले होते की, २०१९ला उद्योगपतींच्या घरी पाच दिवस बैठका झाल्या शिवसेनेला बाहेर काढण्याचा तेव्हाही प्रयत्न झाला. भाजपाने सांगितलं की २५ वर्षांचा मित्र आहे त्याला सोडू शकत नाही.

 

 

२०१९ला तिथेही पवार केंद्रात ठरवून आले की, मोदींसाहेबांसोबत निवडणुकीनंतर सरकार भाजपा राष्ट्रवादीचे असेल. त्यानंतर मग ठाकरे फडणवीस भांडण समोर आले. भाजपाने शिवसेनेला सोडले ते पवारांच्या सांगण्यावरून मी यावेळीही चर्चांत नव्हतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा