कमी प्रतिसाद मिळणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. काही अपवाद वगळता ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस संपूर्ण क्षमतेने धावत आहेत. मात्र, कमी प्रवासीसंख्या असणाऱ्या इंदूर-भोपाळ, भोपाळ-जबलपूर आणि नागपूर-बिलासपूर एक्स्प्रेससारख्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेससह अन्य रेल्वेगाड्यांच्या तिकीटदरांचा आढावा घेतला जाणार आहे. सध्या देशभरात ४६ ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावत आहेत.
जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भोपाळ-इंदूर वंदे भारत ट्रेनमध्ये केवळ २९ टक्के बुकिंग झाले आहे. तर, इंदूर-भोपाळच्या परतीच्या ट्रेनमध्ये केवळ २१ टक्के बुकिंग होऊ शकले आहे. दोन्ही शहरांमधील प्रवासासाठी सुमारे तीन तास लागतात. या तीन तासांच्या प्रवासासाठी एसी चेअरकारचे एक तिकीट ९५० रुपये तर, एग्झिक्युटिव्ह चेअरकारचे तिकीट १५२५ रुपये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिकीटदराचा फेरआढावा घेतला जाऊ शकतो. वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये सर्वांत जास्त प्रवास हा १० तासांचा तर, सर्वांत कमी प्रवास हा तीन तासांचा आहे.
हे ही वाचा:
सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध
उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची पुडी
पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर गुप्तहेर असल्याचा संशय
दोघात तिसरा आला,आता बळ कुणाचे वाढेल?
कमी तासांच्या ट्रेनचे दर कमी?
विशेषत:दोन ते ते पाच तास प्रवासाच्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या तिकीटदरांचा आढावा घेतला जाणार आहे. या ट्रेनच्या तिकिटांचे दर कमी केल्यास त्या चांगल्या चालू शकतील, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. नागपूर-बिलासपूर रेल्वेचा प्रवास पाच तास ३० मिनिटांचा आहे. या ट्रेनमधील तिकिटेही ५५टक्के बुक असतात. तिकीटदर कमी केल्यास या ट्रेनही व्यवस्थित धावू शकतील, असे मानले जात आहे. या ट्रेनच्या एग्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे दोन हजार ४५ रुपये आहे. तर, चेअरकारचे भाडे एक हजार ७५ रुपये आहे.