24 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषकेदारनाथ मंदिराच्या आवारात आता मोबाईल फोनवर बंदी !

केदारनाथ मंदिराच्या आवारात आता मोबाईल फोनवर बंदी !

जगभरातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असल्याने, केदारनाथ ट्रस्टचा निर्णय

Google News Follow

Related

बारा जोतिर्लिंगापैकी मानले जाणारे एक म्हणजे केदारनाथचे भगवान शिवशंकराचे मंदिर.याच केदारनाथ मंदिर परिसरात लवकरच मोबाईल फोनवर बंदी घालण्यात येणार असल्याचे मंदिराच्या ट्रस्ट कडून सांगण्यात आले आहे.भक्तांद्वारे मंदिराच्या आवारात तयार केल्या जात असलेल्या इन्स्टाग्राम आणि यूट्यूब रील्सवर मंदिराच्या ट्रस्टने आक्षेप घेतला आहे.मंदिराच्या आवारात रील्स बनवत असल्यामुळे जगभरातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.त्यामुळे लवकरच केदारनाथ मंदिरात फोनवर बंदी घालण्यात येणार असल्याचे 3 जुलै, सोमवार रोजी, बद्रीनाथ केदारनाथ ट्रस्टने एक अधिसूचना जारी करून सूचित केले आहे.

केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते.केदारनाथ येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनाला येत असतात.त्यातीलच काही भाविक सद्याचा सोशल मीडियाचा जमाना असल्याकारणाने तरुण पिढी आपले चाहते वाढवण्यासाठी युट्युब , फेसबुक तसेच इंस्टाग्रामवर शॉर्ट व्हिडिओ म्हणजे रील्स बनवतात.रील्स बनवण्याच्या नादात गडकिल्ल्यापासून ते मंदिराच्या दारापर्यंत कोणतेही ठिकाण या तरुण पिढीने सोडले नाही.अशा घटनांमुळे अनेकांच्या भावना दुखावतील याचा कोणीही विचार करत नाही.अशा प्रकरणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

केदारनाथ मंदिर ट्रस्टने अशा लोकांच्या बाबतीत कठोर पाऊल उचलले आहे.केदारनाथ मंदिर परिसरात लवकरच मोबाईल फोनवर बंदी घालण्यात येणार असल्याचे पत्रातून सांगण्यात आले आहे. तसेच रील्स बनवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीच्या पत्रात नमूद केले आहे.मागील काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम अॅपवर एक व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या काही दिवसांनंतरची गोष्ट आहे. ज्यामध्ये एक महिला तिच्या प्रियकराला केदारनाथ मंदिरासमोर प्रपोज करताना दिसत आहे.

हे ही वाचा:

वय झाले, आता थांबा, फक्त आशीर्वाद द्या!

शरद पवार हे विठ्ठल; विठ्ठलाला पक्षातील बडव्यांनी घेरलं

दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले, उपराज्यपालांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करू शकत नाही

क्रिती सॅननच्या प्रॉडक्शन हाऊसशी सुशांत सिंगचं काय आहे कनेक्शन?

विशाखा फुलसुंगे अशी या महिलेची ओळख आहे जी इंस्टाग्रामवर ८ लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेली प्रभावशाली आहे, तिने गुडघ्यावर बसून मंदिराच्या आवारात तिच्या प्रियकराला प्रपोज केले.या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि केदारनाथ मंदिर हे पिकनिक स्पॉट नसल्याचे सूचित करणाऱ्या अनेकांनी त्यावर टीकाही केली. हे स्थान भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने आदर करणे आवश्यक आहे.“हे रील बनवण्याची जागा नाही,” असे एका वापरकर्त्याने सांगितले. तर इतरांनी अशा पवित्र ठिकाणी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर बंदी घालण्याची मागणी केली.

बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनीही या विषयावर भाष्य केले होते आणि धार्मिक स्थळांना प्रतिष्ठा, श्रद्धा आणि परंपरा असतात आणि भाविकांनी त्यानुसार वागले पाहिजे, असे म्हटले होते.केदारनाथ मंदिरातील अनेक रील्स अलीकडे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. अनेक हिंदू मंदिरांमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर बंदी आहे आणि आवारात मोबाइल फोनवर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे.त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून प्रभावशालींवर कठोर कारवाई केली जाईल, असे बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीने सोमवारी सांगितले. मंदिर परिसरात फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर लवकरच बंदी घालण्यात येऊ शकते, असेही या पत्रात सूचित करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा