28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेष‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत १२ लाख वारकऱ्यांची मोफत तपासणी

‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत १२ लाख वारकऱ्यांची मोफत तपासणी

राज्य सरकारचा उपक्रम

Google News Follow

Related

राज्याचा आरोग्य विभाग आणि पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाच्यावतीने यंदाच्या आषाढी वारीनिमित्त खास वारकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत आरोग्य वारीत ११ लाखांहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत.

तपासणी करण्यात आलेल्या एकूण वारकऱ्यांपैकी पालखी मार्गावर तपासणी करण्यात आलेल्या ६ लाख ६४ हजार ६०७ तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये ५ लाख ७७ हजार अशा एकूण १२ लाख ४१ हजार ६०७ वारकऱ्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

वय झाले, आता थांबा, फक्त आशीर्वाद द्या!

शरद पवार हे विठ्ठल; विठ्ठलाला पक्षातील बडव्यांनी घेरलं

दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले, उपराज्यपालांच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करू शकत नाही

क्रिती सॅननच्या प्रॉडक्शन हाऊसशी सुशांत सिंगचं काय आहे कनेक्शन?

राज्य सरकारच्या आदेशानुसार यंदा देहू- आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी २७ ते २९ जून २०२३ या कालावधीत वाखरी, गोपाळपूर आणि तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय विठ्ठल मंदिर परिसरामध्ये, वाळवंट ठिकाणी तीन आणि ६५ एकर येथे एक ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रम राबविण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा