पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीत राष्ट्रगीत म्हटल्यावर मोदींच्या पाया पडणारी गायिका मेरी मिलबेन हिने राहुल गांधींवर खरमरीत टीका केली आहे.
द न्यू इंडियन या माध्यमाच्या रोहन दुआ यांना दिलेल्या मुलाखतीत मिलबेनने म्हटले की, जी व्यक्ती सातत्याने आपल्या देशाबद्दल नकारात्मक आणि वाईट बोलते त्या व्यक्तीला देश कसा पाठींबा देईल? खरा नेता तोच असतो जो आपल्या देशाची संस्कृती, परंपरा याबद्दल अभिमानाने बोलतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतात प्रेम मिळते, आदर मिळतो.
मिलबेन म्हणाली की, अर्थात आपण राहुल गांधी यांना खास ओळखत नाही. पण त्यांची काही वक्तव्ये आपण ऐकलेली आहेत. त्यामुळे अधिक मी त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. राहुल गांधी यांनी या आधी केलेल्या अमेरिकेच्या दौऱ्यात भारतातील परिस्थितीवर बिनबुडाचे आरोप केले होते. त्यांनी भारतीय लोकशाही, नेते, पक्ष याबद्दल निराधार दावेही केले. या काळात त्यांनी सुनीता विश्वनाथ यांच्याशीही संवाद साधला होता. सुनीता यांचा इंडियन अमेरिकन मुस्लिम संघटनेशीही संबंध आहे.
बराक ओबामा यांच्या वक्तव्याविषयीही मिलबेनला विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली की, ओबामा यांचे वक्तव्य हे उद्दाम आणि उद्धट असे होते. विशेषतः ओबामा हे विद्यमान अध्यक्ष बायडेन यांच्या पक्षातील उपाध्यक्ष राहिलेले असताना त्यांनी मोदींच्या या दौऱ्यादरम्यान असे विधान केले. जगात सध्या धर्माच्या नावावर छळ होत असल्याचेही ती म्हणाली.
हे ही वाचा:
फ्रान्समध्ये हिंसाचार प्रकरणी ३ हजार अटकेत; बहुसंख्य मुस्लिमांचा समावेश
तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष; आव्हाडांना, जयंत पाटलांना हटवले
राजकीय पक्षांना द्यावा लागणार ऑनलाईन तपशील
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने ओबामा यांनी वक्तव्य केले होते की, भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांवर अन्याय होत असल्याचे बायडेन यांनी मोदींना सांगायला हवे. मोदी सरकारच्या काळात पुन्हा फाळणी होईल अशी टिप्पणीही ओबामा यांनी केली होती.
आपण जर मोदींशी संवाद साधला असता तर आपण त्यांना भारतातील अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे हनन होत राहिले तर ते भारताला कसे नुकसानकारक ठरेल असे विचारले असते. ओबामा यांच्या या विधानावर टीका झाली होती.