‘सोलापूर शहर’ जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाजुला अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला ‘धार्मिक पर्यटन क्षेत्र’ म्हणून घोषित करणार. तसेच सोलापूर येथे प्रथमच सुरू झालेल्या हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी कॉलेजला ‘श्री स्वामी समर्थांचे’ नाव देण्यात येणार असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.३ जुलै रोजी झालेल्या पर्यटन विभागाच्या वतीने या कॉलेजच्या पदवी-पदविका अभ्यासक्रमाचा शुभारंभ लोढा यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य, आ. विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पर्यटन विभागाचे संचालक डॉ. भगवतंराव पाटील, व्यवस्थापकिय संचालक श्रध्दा जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.गुरू पोर्णिमेचा मुहूर्त साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कॉलेजच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातून हॉटेल व्यवसायासाठी लागणारे चांगले मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात पर्यटनाचा ओघ सुध्दा वाढणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
अजित पवारांच्या येण्यामुळे महायुतीला अधिक ताकद मिळेल!
खासदार अमोल कोल्हेंचा यु टर्न; शरद पवारांसोबत असल्याचे ट्वीट
विरोधकांची बेंगळुरू बैठक पुढे ढकलली! राष्ट्रवादीतील फूट हे कारण?
आधी नितीश, केजरीवाल, नंतर महाराष्ट्र विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडे
आपल्या राज्यात पर्यटनासाठी येणाऱ्याचे आदरातिथ्य चांगले व्हावे, पर्यटनासाठी आलेले जास्त दिवस राहावेत यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे ते प्रशिक्षण या कॉलेजच्या माध्यमातून मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात धार्मिक तीर्थस्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. कामगारांची संख्या अधिक आहे. याची सांगड घालून पर्यटनासाठी आलेल्यांकडून या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. सोलापूर जिल्ह्याला धार्मिक पर्यटनाचा दर्जा मिळाल्यास रोजगारांच्या संधी आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी नमूद केले.