अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड)चे मुख्य बंदर असलेल्या मुंद्रा बंदरावर ३०० मीटर लांब आणि ५४ मीटर रूंदीचे विशाल जहाज पोहोचले आहे.
एमव्ही एमएससी हॅमबर्ग नावाच्या या जहाजाची जगभरातील सर्वांत मोठ्या जहाजांमध्ये नोंद होते. या जहाजाचा आकार फुटबॉलच्या चार मैदानांच्या आकाराएवढा आहे. हे जहाज एक मालवाहू जहाज आहे. ज्याची वहनक्षमता १५ हजार ९८० टीईयू (कंटेनर) आहे. याआधी या बंदरावर १३ हजार ८९२ टीईयू क्षमतेचे एपीएल रॅफल्स हे जहाज आले होते. त्या जहाजाची लांबी ३९७.८८ मीटर आणि रुंदी ५१ मीटर होती. आता त्याच्याही पेक्षा असे मोठे हॅमबर्ग मालवाहू जहाज मुंद्रा बंदराच्या धक्क्याला लागले आहे.
सन २०१५ला बनवण्यात आलेले हे जहाज २ जुलै रोजी मुंद्रा बंदरावर पोहोचले. मुंद्रा बंदरावर आता सर्व सेवा पूर्ववत झाल्या आहेत. बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर बंदरावरील दळवळण सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
हे ही वाचा:
खासदार अमोल कोल्हेंचा यु टर्न; शरद पवारांसोबत असल्याचे ट्वीट
विरोधकांची बेंगळुरू बैठक पुढे ढकलली! राष्ट्रवादीतील फूट हे कारण?
‘कोणतीही अनियमितता नाही; पालिकेच्या मुदतठेवी वाढत आहेत’
भिवंडीत कारखान्याची भिंत कोसळून १० वर्षीय मुलाचा मृत्यू
वाढत्या सागरी उद्योगाचे चिन्ह
एवढ्या मोठ्या आकाराचे जहाज बंदरात येणे, ही भारतासाठी मोठी कामगिरी असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे समुद्रमार्गे होणारा उद्योग आणि व्यापाराचा विकास होत असल्याचे सुचिन्ह दिसू लागले आहे. मुंद्रा बंदरात २४ तासांत तब्बल ४० जहाजांची वाहतूक होते. यावरूनच या बंदराचे वैशिष्ट्य अधोरेखित होते.