७० आणि ८०च्या दशकांत अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम केलेले अभिनेते हरिश मैगन यांचे निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांनी ‘गोलमाल’ आणि ‘नमकहलाल’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांत काम केले होते.
हरिश मैगन यांचे शनिवारी देहावसान झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा सिद्धार्थ आणि मुलगी आरुषी आहे. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन (सिंटा)ने त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते १९८८पासून सिंटाचे सदस्य होते. सोशल मीडियावरूनही त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
हरिश मैगन यांचा जन्म ६ डिसेंबर १९४६ रोजी झाला होता. त्यांनी पुण्याच्या एफटीआयआयमधून पदवी प्राप्त केली होती. ते सन १९७४च्या बॅचचे विद्यार्थी होते. हरिश मैगन यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमधून काम केले. त्यांच्या त्याच छोट्या परंतु महत्त्वाच्या भूमिका असत. त्यांनी ‘नमकहलाल’, ‘चुपकेचुपके’, ‘मुक्कदर का सिकंदर’, ‘खुशबू’,‘ इन्कार’, ‘गोलमाल’ आणि ‘शहेनशाह’ यांसारख्या चित्रपटांत काम केले होते. त्यांनी सन १९९७मध्ये ‘उफ्फ ये मोहब्बत है’ या चित्रपटात शेवटची भूमिका केली होती.
हे ही वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सत्तेत सहभागी; पुढील निवडणुका पक्ष, चिन्हासोबतच लढवणार
प्रतोद आणि विरोधी पक्षनेते पद जितेंद्र आव्हाडांकडे
‘अमरनाथ’ यात्रेदरम्यान स्फोटाचा मोठा कट पोलिसांनी उधळवून लावला
ते मुंबईतील जुहू भागात एक अभिनय शिक्षण संस्थाही चालवत. या संस्थेचे नाव हरिश मैगन ऍक्टिंग स्कूल असे होते. तसेच, ते रोशन तनेजा ऍक्टिंग स्कूलमध्येही अभिनयाचे धडे शिकवायला जात.