मुंबई क्रिकेट असोसिएशनने आता ठाणे आणि नवी मुंबईत दोन क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे.मुलांना क्रिकेट खेळण्यासाठी मैदाने अपुरे पडत आहेत.तसेच अनेक खेळाडू क्रिकेट सराव, सामने किंवा विविध वयोगटांच्या शिबिरांसाठी दक्षिण मुंबईला गर्दीच्या ट्रेनमधून प्रवास करतात.खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, खेळाच्या मैदानांची संख्या आहे तशीच आहे.त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबई येथे नवीन क्रिकेट मैदान उभारणार असल्याचे ,एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी सांगितलॆ.इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अमोल काळे यांनी याची माहिती दिली.
“आम्ही नवी मुंबई आणि ठाण्यात दोन नवीन पायाभूत सुविधांचा विचार करत आहोत . आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे आणि आम्हाला जमीन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी संपर्क साधणार आहोत जेणेकरून आम्हाला येत्या काही वर्षांत आणखी दोन मैदाने मिळतील.एमसीएकडे सध्या तीन मैदाने आहेत- वानखेडे स्टेडियम, एमसीए-बीकेसी मैदान आणि सचिन तेंडुलकर जिमखाना, ते पुढे म्हणाले.
काळे यांनी स्पष्ट केले की, नवीन विकास ठाणे आणि नवी मुंबईतील खेळाडूंना मदत करेल. अनेक खेळाडू क्रिकेट सराव, सामने किंवा विविध वयोगटांच्या शिबिरांसाठी दक्षिण मुंबईला गर्दीच्या ट्रेनमधून प्रवास करतात.त्यामुळे नवीन मैदानांची निर्मिती झाल्यास खेळाडूंना सोईस्कर होईल. दरम्यान, एमसीए सर्वोच्च परिषदेने नोकरशहा सतीश सोनी यांची सीओओ (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) प्रकल्प म्हणून नियुक्ती केली आहे.
हे ही वाचा:
‘अमरनाथ’ यात्रेदरम्यान स्फोटाचा मोठा कट पोलिसांनी उधळवून लावला
अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे
समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?
“MC ने सतीश सोनी यांची नवीन सीओओ-प्रोजेक्ट म्हणून नियुक्ती केली आहे. ते असोसिएशनचे सर्व चालू आणि प्रलंबित प्रकल्प पाहतील. सर्व प्रश्न सोडवून त्यावर तोडगा काढण्याची त्यांची भूमिका असेल, असेही काळे यांनी सांगितले.सर्वोच्च परिषदेने घेतलेल्या दुसर्या निर्णयात, संलग्न सामान्य मैदानाच्या क्लबसाठी किट आणि उपकरणे अनुदान निधी २० कोटींपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती, अशी माहिती काळे यांनी दिली.
एमसीएने त्यांच्या मान्सून कांगा लीगसाठी खेळाडूंच्या हस्तांतरणाची अंतिम तारीख २० जुलै ठेवली आहे.एमसीए लवकरच एमसीए-बीकेसी क्लब हाऊस चालविण्यासाठी स्वारस्य व्यक्त करण्यासाठी कॉल करणार आहे कारण विद्यमान कंपनीचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे.त्यामुळे लवकरच महाराष्ट्र्र सरकारशी संपर्क साधून ठाणे आणि नवी मुंबई येथे नवीन मैदानांचा प्रस्ताव सरकार पुढे मांडणार असल्याचे काळे म्हणाले.