ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी शनिवारी रात्री ट्वीट करून ट्विटरसंदर्भात नवीन नियमांची घोषणा केली. आता ‘अन व्हेरिव्हाइड अकाऊंट’ असणारे एका दिवसात केवळ ६०० ट्वीट्स वाचू शकणार आहेत. तर, ट्विटरवर ब्लू टिक म्हणजेच व्हेरिव्हाइड अकाऊंट्स असणारे दिवसाला सहा हजार ट्वीट्स वाचू शकतील. तसेच, नवे ट्विटर अकाऊंट्स दिवसाला केवळ ३०० ट्वीट्सच वाचू शकतील. अर्थात, ही मर्यादा काही कालावधीपुरतीच मर्यादित असेल.
‘डेटा स्कॅपिंग आणि यंत्रणेतील बदलांच्या पार्श्वभूमीवर हे नियम मर्यादित कालावधीसाठी लागू करण्यात आले आहेत,’ अशी माहिती त्यांनी दिली.जगभरात ट्विटर डाऊन झाल्यानंतर शनिवारी रात्री हा निर्णय घेण्यात आला. शनिवारी रात्री हजारो वापरकर्त्यांनी ट्वीट्स रिफ्रेश होत नसल्याची तक्रार केली. ट्विटरची मालकी मस्ककडे आल्यानंतर ट्विटर डाऊन होण्याची ही तिसरी वेळ आहे. याबाबत होणाऱ्या त्रासाची माहिती काहींनी अन्य सोशल मीडियावर दिली. त्यानंतर काही मीम्सही व्हायरल झाले. काही जणांनी ट्विटर वारंवार डाऊन होत असल्याबद्दल संतापही व्यक्त केला.
हे ही वाचा:
‘अमरनाथ’ यात्रेदरम्यान स्फोटाचा मोठा कट पोलिसांनी उधळवून लावला
अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा २२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू
अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे
समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?
११ लाखांहून अधिक अकाऊंटवर बंदी
चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या अकाऊंटना रोखण्यासाठी ट्विटरने कठोर पावले उचलली आहेत. कंपनीने २६ एप्रिल ते २५ मेपर्यंत भारतामधील एकूण ११ लाख ३२ हजार २२८ अकाऊंटवर बंदी घातली आहे. अल्पवयीन मुलांवरील अत्याचार आणि दहशतवाद संदर्भातील धोरणांचे उल्लंघन या अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली आहे.