गेल्या वर्षी साधारण याचं महिन्यात शिवसेनेमध्ये उभी फुट पडून सत्तांतर झाले होते. शिवसेनेमध्ये झालेल्या राजकीय भुकंपानंतर आता एका वर्षाच्या आत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ आमदार मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, अमोल कोल्हे आदी नेते राजभवनात उपस्थित होते.
काही वेळापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. यानंतर अजित पवारांनी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते पाहता शरद पवार यांचा या शपथविधीला पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. मात्र, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत शरद पवार यांचा या घडामोडींना पाठिंबा नसल्याचं सांगितलं आहे.
हे ही वाचा:
“मी अजित अनंतराव पवार, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की…”
पवारांचा गुगली आणि फडणवीसांचा यॉर्कर…सोशल मीडियात प्रतिभेला महापूर
पुण्यात कोयत्याची दहशत; वाद झाला आणि तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता नेला
फ्रान्समध्ये आंदोलकांकडून ऍपल, नायकीच्या दुकानांची लूट
“महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच श्री.शरद पवार यांच्याशी बोलणे झाले.ते म्हणाले” मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही,” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.