29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषसमृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?

समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी एक्स्प्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू

Google News Follow

Related

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी एक्स्प्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताला मानवी चूक कारणीभूत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

समृद्धी एक्स्प्रेसवर खांबाला जोरदार धडकल्यामुळे ही खासगी बस उलटली आणि त्यातील डिझेल टाकीचा स्फोट होऊन संपूर्ण बसला आग लागली, अशी माहिती या अपघातातून बचावलेल्या बसच्या चालकाने दिली आहे. मात्र चालकाला झोप लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले असावे आणि हा अपघात झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यावेळी बसमध्ये ३३ प्रवासी होते. त्यातील चालक, क्लीनरसह आठ जण तुटलेल्या खिडक्यांमधून बाहेर पडून स्वत:ची सुटका करू शकले. हा अपघात सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला.
यवतमाळ जिल्ह्यातील करंजा येथे भोजनासाठी विश्रांती घेतल्यानंतर बसने समृद्धी एक्स्प्रेस वेवरून सिंदखेडराजापर्यंतचे १५० किमी.चे अंतर दोन ते अडीच तासांत व्यवस्थित कापले. याचा अर्थ त्यावेळी बसचा वेग हा सरासरी ६०ते ७० किमी होता. त्यामुळे प्राथमिक चौकशीत अपघाताला वेग कारणीभूत नाही. त्यामागे मानवी चूक कारणीभूत असू शकते, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

‘चालकाला डुलकी लागली असावी. त्यामुळे ही बस उजव्या बाजूला जाऊन आधी बॅरिअरला, त्यानंतर दुभाजकाला धडकली असावी,’ असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. चालकाने बसचा टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याचा दावा केला असला तरी त्यावेळी अंधार असल्यामुळे अपघातामागे मानवी चूक कारणीभूत नाही ना, याचा तपास केला जात आहे.

हे ही वाचा:

“त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी’ म्हणायचे का?”

गुजरात उच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाडचा जामीन अर्ज फेटाळला

आदित्य ठाकरेंच्या मनपाविरोधातील मोर्चाचे शिंदेंविरोधातील सभेत रूपांतर

ममतांचा दुखावलेला पाय निवडणुकीत करामत करणार?

अमरावतीच्या आरटीओ अधिकाऱ्यांनीही अपघात टायर फुटल्यामुळे न झाल्याचे म्हटले आहे. अपघाताच्या ठिकाणी रबरचे तुकडे मिळाले नाहीत तसेच, टायरच्या खुणाही आढळल्या नाहीत, असे त्यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा