29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषभारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री म्हणतो, १०० हा माझ्यासाठी केवळ आकडा!

भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री म्हणतो, १०० हा माझ्यासाठी केवळ आकडा!

मला जोपर्यंत खेळातून आनंद मिळतोय, तोपर्यंत मला खेळायचे आहे

Google News Follow

Related

भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आतापर्यंत ९२ आंतरराष्ट्रीय गोल साधण्याची किमया केली आहे. लवकरच दोहा येथे होणाऱ्या आशियाई फुटबॉल कप स्पर्धेत तो आंतरराष्ट्रीय गोलची शंभरी पार करेल, असा विश्वास आहे. याबाबत त्याला विचारले असता, १०० हा माझ्यासाठी केवळ आकडा आहे, त्याने मला काही फरक पडत नाही,’ अशी कबुली दिली आहे.

’मी कधीच आकड्यांचा विचार केला नाही. १५ वर्षांपूर्वी मला कोणी सांगितले असते की, तू भारतासाठी १००हून अधिक सामने खेळशील, तर मला त्यावर विश्वास बसला नसता. जर तू प्रदीर्घ काळ भारताचा कर्णधार राहशील, असे मला कोणी म्हटले असते तर मी त्याला हसण्यावरी नेले असते. आकड्यांनी मला काही फरक पडत नाही. मी माझ्या सहकाऱ्यांना चेंजिंग रूममध्ये सांगतो, तुम्ही हे जाणून घ्या की मी सर्वांत कमी वेगवान खेळाडू आहे आणि फिटनेसच्या बाबतीत माझा क्रमांक शेवटचा आहे. त्यामुळे मी त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करण्यास सांगतो. जर ते फिटनेसमध्ये माझ्यावर मात करू शकले तर तुम्हीच विचार करा, की आमचा संघ काय असेल. हा संघ सर्वाधिक फिट संघ असेल. मला याने फरक पडतो, आकड्यांनी नाही,’ असे सुनील सांगतो. हा मैलाचा दगड असल्याचे तो नाकारत नाही, मात्र या बाबीचा तो फारसा विचार करत नाही. इकॉनॉमिक टाइम्सने घेतलेल्या मुलाखतीत सुनीलने आपले हे मनोगत व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

समृद्धी महामार्ग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा आक्रोश मोर्चा रद्द; ठाकरे गट मोर्चा काढण्यावर ठाम

ममतांचा दुखावलेला पाय निवडणुकीत करामत करणार?

पुतिन यांनी मोदींना फोन करून युक्रेन युद्धाचे कारण सांगितले !

कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी संजीव जयस्वाल यांची ईडीकडून १० तास चौकशी 

सुनीलला त्याच्या फिटनेसबाबत विचारले असताही, तो प्रांजळपणे आपल्या मर्यादा उघड करतो. ‘गुणवत्तेच्या बाबतीत म्हणाल तर मी ना मेस्सी आहे, ना रोनाल्डो. पण मी त्यांच्या इतकी मेहनत तर नक्कीच करू शकतो आणि तेच मी वर्षांनुवर्षे करतो आहे,’ असे सुनीलने सांगितले. त्याने त्याच्या आहाराबाबत पाळलेल्या कठोर शिस्तीबाबतही भाष्य केले. ‘मी मला जे हवे आहे, ते खात नाही. तर, मला जे गरजेचे आहे, त्याचे सेवन करतो,’ असे त्याने सांगितले.

सुनील छेत्री हा आता भारतीय फुटबॉल क्षेत्रात एक आख्यायिका बनली आहे. परंतु स्वत: सुनीलला तसे वाटत नाही. ‘मला जोपर्यंत खेळातून आनंद मिळतोय, तोपर्यंत मला खेळायचे आहे. प्रत्येक खेळ माझ्यासाठी एक आव्हान असतो. मला प्रत्येक वेळी एकच गोष्ट जास्तीत जास्त चांगली करायची असते. त्यामुळेच तुमच्या खेळात सुधारणा होते आणि तुमच्याकडून सातत्यपूर्ण खेळ होतो. तुम्ही प्रत्येकवेळी जिंकू शकत नाही. कधी कधी तुमच्या प्रतिस्पर्धी संघाचा खेळ तुमच्यापेक्षा चांगला होतो. अशा वेळी तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत,’ असे सुनील सांगतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा