संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली असून २३ दिवस अधिवेशन चालणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांनी विधीमंडळ कामकाजात सहभाग घ्यावा आणि विविध विषयांवर चर्चा करावी, असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्वीटद्वारे केले आहे. तसेच अधिवेशनाच्या तारखांची माहितीही त्यांनी दिली आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार असून ११ ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालणार आहे. २३ दिवस चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात एकूण १७ बैठका होतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
‘हे’ मुद्दे अधिवेशनात गाजणार?
संसदेच्या या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी समान नागरी कायद्याचे विधेयक आणण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनातच समान नागरी कायद्याचे विधेयक सभागृहात मांडले गेले तर यावर असलेल्या राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे यावरून वादविवाद होऊ शकतात.
दिल्लीतील केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाचे पडसाद या अधिवेशनात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीतील ट्रान्सफर पोस्टिंगच्या प्रकरणावर उपराज्यपालांना अधिकार देणाऱ्या विधेयकाबाबत मोदी सरकारला घेरण्याचा विरोधक प्रयत्न करू शकतात.
हे ही वाचा:
समृद्धी महामार्गावरील अपघातावर पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी ड्रायव्हर, क्लिनरला पोलिसांनी घेतले ताब्यात
नीरज चोप्राची पुन्हा अव्वल कामगिरी
नव्या संसद भवनातील पहिलेच अधिवेशन
यंदाच्या पावसाळी अधिवेशनाची विशेष बाब म्हणजे नवीन संसद भवनात होणारं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २८ मे रोजी नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर हे वादळी अधिवेशन नव्या संसद भवनात होणार आहे.