कोरोनासाथीनंतर जगभरातूनच आरोग्य क्षेत्राशी संबंधित मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. त्यातच कुशल आणि अनुभवी परिचारिकांनाही पसंती दिली जात आहे. त्यामुळे विशेषत: जर्मनीमध्ये चांगले करीअर घडवण्याची भारतीय परिचारिकांपुढे अभिनव संधी चालून आली आहे.
करोनाच्या साथीनंतर जर्मनीमधून भारतीय परिचारिकांच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच, तेथे मिळणाऱ्या पगारामुळे भारतीय परिचारिकांचीही जर्मनीला पसंती वाढत आहे. जर्मनीकडूनही नर्सिंगमध्ये करीअर करू इच्छिणाऱ्यांना अधिक कौशल्ये शिकवली जात आहेत. त्यांना अद्ययावत शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे स्वत:च्या कौशल्यात वाढ करण्यासाठी भारतीय परिचारिका जर्मनीला पसंती देत आहेत.
आवश्यक अर्हता:
जर्मनीमध्ये परिचारिका म्हणून काम करण्यासाठी भारतीय परिचारिकांनी नर्सिंगचा तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा नर्सिंगमध्ये बीएससीची पदवी घेणे आवश्यक आहे. अनुभव गाठिशी असेल तर उत्तमच. तसेच, बी २ लेव्हलपर्यंत जर्मनी भाषा शिकून शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि संबंधित कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांची पडताळणी केली जाते. त्यानंतर जर्मनीमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होतो.
तारखांकडे लक्ष द्या
ज्यांना जर्मनीत परिचारिका म्हणून जायचे आहे, त्यांनी सतत या संदर्भातील माहिती आणि गरजांबाबत अद्ययावत राहणे आवश्यक आहे. येथील प्रत्येक रुग्णालयाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे जर्मन फेडरल एम्प्लॉयमेंट एजन्सी किंवा जर्मन नर्सिंग असोसिएशन यांच्या वेबसाइटवर या संदर्भातील नेमकी माहिती मिळेल. तिथे भारतीय परिचारिकांची अर्हता आणि त्यांच्या करीअरच्या संधी याबाबत योग्य ती माहिती मिळते.
जर्मनीमध्ये परिचारिका म्हणून नोंदणी
शिक्षणातील आणि प्रात्यक्षिक माहिती यांतील फरकामुळे भारतीय परिचारिका थेट जर्मनीमध्ये नोंदणीकृत परिचारिका म्हणून काम करू शकत नाहीत. त्यांना त्यासाठी समकक्ष कोर्स करावा लागतो किंवा एक नॉलेज परीक्षा द्यावी लागते. अर्थात आठ ते १० वर्षांचा अनुभव असणाऱ्या भारतीय परिचारिका अपवादात्मक परिस्थितीत जर्मनीत थेट नोंदणीकृत परिचारिका म्हणून काम करू शकतात.
हे ही वाचा:
ड्रोनच्या किमतीवरून वाद घालणाऱ्यांनी सत्य तर जाणून घ्या!
वर्षभरापूर्वी केलेल्या धाडसामुळे सत्तांतर घडले!
शरद पवारांचे वक्तव्य गुगली नाही; ती तर गाजराची पुंगी !
तरुणाच्या हत्येनंतर सलग तीन दिवस फ्रान्स पेटलेला
जर्मनमध्ये परिचारिका होण्यासाठी…
१. जर्मन भाषा ए१ आणि ए २ लेव्हलपर्यंत शिका
२. नोकरी देणाऱ्याला बी २ लेव्हलवर मुलाखत द्या
३. मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतर आधी करारपत्र मिळवा.
४. संबंधित नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी प्रक्रिया (Annerkennung) सुरू असतानाच बी१ आणि बी १ लेव्हलपर्यंत जर्मन भाषा शिका
५. भारतीय परिचारिकांची पदवी जर्मनीमध्ये नोंदणीकृत नसल्याने जर्मनीच्या नर्सिंग कौन्सिलकडून दोन पर्याय दिले जातात. एकतर तेथे समकक्ष अभ्यासक्रम (Anpassugslehrgang) पूर्ण करायचा किंवा नॉलेज एग्झाम (kenntnisprufung) पूर्ण करायची.
६. ऍनेरकेनंगच्या निकाल आल्यानंतर व्हिजा प्रक्रिया पूर्ण करायची.
७. kenntnisprufung परीक्षेची तयारी करत असतानाच तेथील जर्मन रुग्णालयात अंदाजे २१०० ते २३०० युरो प्रति महिना वेतनाची नोकरी पकडायची.
८. Kenntnisprufung परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही नोंदणीकृत परिचारिका म्हणून काम करू शकता. तेव्हा तुमचे वेतन प्रति महिना २८०० ते ३००० युरोपर्यंत पोहोचले असेल.
जर्मन भाषेवर प्रभुत्व मिळवणे अत्यावश्यक असल्याने त्यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
योग्य सल्लागाराची निवड
जर्मनीमध्ये परिचारिका म्हणून जाण्यासाठी योग्य सल्लागाराची निवड करणेही गरजेचे आहे. भारतात स्टडी फीड्स ही कंपनी जर्मनीमधील शैक्षणिक संस्थांसाठी भारतात मार्गदर्शन करते. ही संस्था जर्मनीवर प्रभुत्व मिळवण्यापासून प्रशिक्षण तसेच परीक्षा उत्तीर्ण होण्यासंदर्भात तसेच, व्हिजा प्रक्रियेसंदर्भातही मार्गदर्शन करते.