बोरिवलीतील मागाठाणे येथील मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ जमीन खचल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका खाजगी बांधकाम प्रकल्पाच्या कंत्राटदाराला आणि साइट अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारी वरून कस्तुरबा मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. शहरात मुसळधार पावसामुळे मेट्रो लाइन-7 वरील मागाठाणे स्थानकाला लागून असलेल्या खोदकामाच्या ठिकाणी जमीन खचण्यास सुरुवात झाली होती. हे खोदकाम एका खासगी बिल्डरकडून करण्यात आले होते, या खोदकामामुळे अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्व दरम्यान मेट्रो रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
हे ही वाचा:
देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटाला पवारांचे गोलमोल उत्तर
येणार तर ‘नरेंद्र मोदीचं’; नितीन गडकरी यांची ‘भविष्यवाणी’ !
गुगली टाकून पवारांकडून उरलेले सत्य वदवून घेईन!
कॅनडातून अमेरिकेत ८०० पेक्षा अधिक भारतीयांना घुसवले; भारतीयाला झाली शिक्षा
एमएमआरडीएच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३३६ (मानवी जीव धोक्यात आणणारे अविचारी आणि निष्काळजी कृत्य) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
खाजगी कंत्राटदार आणि साइट अभियंता यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यांनी त्यांची जामिनावर सुटका केली,” असे अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.