27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषचुकीच्या तथ्यांसह ‘कुराण’वर डॉक्युमेंटरी बनवा, बघा काय होते ते

चुकीच्या तथ्यांसह ‘कुराण’वर डॉक्युमेंटरी बनवा, बघा काय होते ते

अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदिपुरुष निर्मात्यांना पुन्हा फटकारले

Google News Follow

Related

‘आदिपुरूष’ या चित्रपटामध्ये रामायणातील व्यक्तिरेखांची मांडणी ‘अत्यंत लज्जास्पद पद्धती’ने करण्यात आली आहे, अशा शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने बुधवारी ताशेरे ओढले. ‘कुराण’च्या संदर्भात असे काही केले गेले असते तर कायदा-सुव्यवस्थेची स्थिती काय असती, याची तुम्ही कल्पना करू शकता का?, असा प्रश्नही न्यायालायने उपस्थित केला.

२८ जून रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘आदिपुरुष’ चित्रपटामधील आक्षेपार्ह संवाद आणि दृश्यांना आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर पुन्हा सुनावणी सुरू केली. न्या. राजेशसिंह चौहान आणि न्या. श्री प्रकाश सिंह यांच्या सुटीकालीन पीठासमोर याबाबत सुनावणी सुरू आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, एक दिवस आधी २७ जून रोजी न्यायालयाने या प्रकरणी तासभर सुनावणी घेतली होती.

सुनावणीला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर न्यायालयाने चित्रपटात दाखवलेल्या धार्मिक पात्रांच्या चित्रणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटात दाखवल्याप्रमाणे रामायणातील पात्रांबाबत असा विचार कोणी करेल का, असा प्रश्न विचारण्यात आला.

‘चित्रपटात ज्या प्रकारे धार्मिक पात्रे दाखवली आहेत, त्यावरून ते अशा प्रकारे अस्तित्वात होते, अशी कल्पना तरी कुणी करेल का? चित्रपटातील पात्रांनी जसा पेहराव परिधान केला आहे, तशा देवांची आपण कल्पना केली आहे का? रामचरितमानस हा पवित्र ग्रंथ आहे, लोक घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्याचे पठण करतात आणि तुम्ही त्याचे चित्रण इतक्या दयनीय पद्धतीने करता?’, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. चित्रपटाला प्रमाणपत्र देणाऱ्या सेन्सॉर बोर्डावरही न्यायालयाने टीका केली आणि अशा चित्रपटाला प्रमाणपत्र देऊन चूक केल्याचे म्हटले. ‘अशा प्रकारे रामायण दाखवणारे लोक धन्य आहेत,’ अशी टीकाही न्यायालयाने केली.

अलीकडच्या काळात हिंदू देवतांचे विविध चित्रपटांमध्ये विनोदी पद्धतीने चित्रण करण्यात आल्याची उदाहरणेही त्यांनी दिली. ‘आज आम्ही तोंड बंद करू, पण तुम्हाला माहिती आहे का की, पुढे काय होईल? या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मी एक चित्रपट पाहिला, ज्यामध्ये शंकर हे देव त्यांच्या त्रिशूलसह अतिशय गमतीदार पद्धतीने धावत असल्याचे दाखवले होते. आता अशा गोष्टी दाखवणार का? चित्रपट व्यवसाय करतात म्हणून चित्रपट निर्माते पैसे कमावतात. कोणत्याही डॉक्युमेंटरीमध्ये कुराणबद्दल चुकीच्या गोष्टी दाखवल्या गेल्या असत्या तर त्याचे गंभीर परिणाम झाले असते.

हिंदू समाजातील सहिष्णुतेमुळे चित्रपट निर्मात्यांनी मोठी चूक करूनही परिस्थिती बिघडली नाही,’ असे न्यायालयाने अधोरेखित केले. ‘रामायण, कुराण आणि बायबल यांमुळे भावना दुखावल्या जात असतील, तर त्यावर चित्रपट का तयार केले जातात? अशा पवित्र ग्रंथांना स्पर्श करू नये आणि कोणत्याही धर्माचे नकारात्मक चित्रण केले जाऊ नये,’ असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी केले.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न, अहमदनगरचे काळे दाम्पत्य मानाचे वारकरी

रहिवासी संकुलांमध्ये बकऱ्यांची कत्तल करण्यास मनाई

टोमॅटोचे दर गगनाला का भिडले आहेत?

‘रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण’ चोरी करणारे पोलिसांकडून ‘जेरबंद’!

“अशा प्रकारचे चित्रपट तयार करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्याची गरज आहे. धार्मिक विषयांवर चित्रपट तयार करताना एखादा धर्म किंवा समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत.”

– अलाहाबाद उच्च न्यायालय

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा