23 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरक्राईमनामा'रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण' चोरी करणारे पोलिसांकडून 'जेरबंद'!

‘रस्त्यावरील मॅनहोलचे झाकण’ चोरी करणारे पोलिसांकडून ‘जेरबंद’!

तब्बल २६ नग चोरीला, एका झाकणाची विक्री रुपये ९,५००

Google News Follow

Related

रस्त्यावरील मॅनहोलचे लोखंडी झाकणाची चोरी दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरपालिका, पोलीस प्रशासन अशा चोरांना पकडून त्यांच्यावर कारवाई करत आहेत.तशीच एक घटना मुंबई उपनगरातील आय.सी.कॉलनी ,बोरिवली पश्चिम येथे घडली. या घटनेची तपासणी करत पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे यांच्या पथकाने कारवाई करत संबंधित दोघांना अटक केली.दि.२६/०६/२०२३ रोजी फिर्यादी श्रीमती प्राजक्ता दिलीप दवंगे (२६) यांनी आर/ मध्य विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतर्फे पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दिली .

तक्रारीत नमूद केले की, शांती आश्रम बस डेपो बोरिवली पश्चिम, मुंबई येथील डांबरी रोडवरील मध्यभागी असलेले मॅनहोलचे लोखंडी झाकण त्यावर एम.सी.जी.एम लिहिलेले अशी विविध ठिकाणावरून एकूण २६ नग जुने वापरते लोखंडी झाकण हे कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केलेले आहेत. त्यावरून फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून अज्ञातांवर गु.नो.क्र. २७४/२०२३, कलम३७९ भा.द.वि अन्वये नोंद करण्यात आला.

हे ही वाचा:

रोममधील त्या रोमिओला होणार शिक्षा; कोलोझियम वास्तूवर कोरले नाव

थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही

सोसायटीत बकरा आणला म्हणून रहिवाशांनी विरोध करत केलं हनुमान चालीसाचं पठण

समान नागरी कायद्यावरील मोदींच्या विधानानंतर खळबळ

सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे व पथक यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दिनांक २२/०६/२०२३ रोजी आरोपी नामे कमलेश उर्फ बंटी जगदीश सोळंकी (२९) यास बोलवण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले की मॅनहोलच्या लोखंडी झाकणाची चोरी त्याने केली. पुढे तपासात असे आढळून आले की, हे चोरी केलेल्या झाकणाची आरोपी अब्दुल गल्ली मोहम्मद नजीर शाह (५१) यास विक्री केली. मालखाऊ भंगार आरोपी अब्दुल यास पोलिसांकडून अटक करण्यात आली.

आरोपीकडून सदर गुन्ह्यातील चोरी केलेले झाकणाची किंमत रुपये ९,५०० हस्तगत करण्यात आलेली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.सदर कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग-मुंबई ,श्री.राजीव जैन, मा.पोलीस आयुक्त, परिमंडळ -११, मुंबई, श्री.अजय कुमार बंसल यांचे मार्गदर्शनाखाली श्री. धर्मेंद्र कांबळे, मा. सपोआ बोरिवली विभाग मुंबई, श्री सुधीर कुडाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एच.कॉलनी पोलीस ठाणे मुंबई व पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांचे प्रत्यक्ष अधिकारी की देखरेखी खाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार, पोलीस उपनिरीक्षक अखिलेश बोंबे, पो. ह.क्रं ९९०३२०जोपळे, पो.ना.क्रं ०९०७९९/ देवकर, पो.शि.क्रं ०८०४६१/आहेर, पो.शि.क्रं १३०१६४/ शेरमाळे यांनी पूर्ण केलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा