27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणमुंबईतील दोन सागरी सेतूंना सावरकर, अटलजींचे नाव

मुंबईतील दोन सागरी सेतूंना सावरकर, अटलजींचे नाव

मंत्रिमंडळ बैठकीतील २८ निर्णय

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार, २८ जून रोजी मंत्रीमंडळ बैठक पार पडली. यावेळी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. वर्सोवा- वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असं नाव देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. याची घोषणा पूर्वीचं केलेली असून त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं. याखेरीज मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी मागणी करणारं पत्रं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी वर्सोवा- वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्रवीर सावरकरांचं नाव दिलं जाणार असल्याची घोषणा केली होती. आज मंत्रिमंडळ बैठकीत याची घोषणा करण्यात आली. याशिवाय, मेट्रो-३, आपला दवाखाना, क्लस्टर योजनेसह अनेक योजनांसंबंधी निर्णय घेण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

वॅगनरनंतर जगभरातील खासगी लष्करी दलांकडे वळले लक्ष

थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही

डॉक्टरांचा सल्ला झुगारून दुखापतग्रस्त ममता बॅनर्जी घरी परतल्या

मुंबई महापालिका कोविड घोटाळा: लाईफलाईन कंपनीच्या कागदांवरील डॉक्टर्स अस्तित्वातचं नाहीत!

मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले २८ निर्णय –

  1. वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव
  2. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव.
  3. राज्यात ७०० ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’; २१० कोटी रुपयांना मान्यता.
  4. भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ.
  5. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. २ कोटी कार्ड वाटणार; आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.
  6. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ.
  7. आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार.
  8. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश.
  9. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.
  10. पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ कि.मी.च्या नद्यांमधील गाळ काढणार.
  11. मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड.
  12. भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण.
  13. मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल, वरूड, फलटण येथे न्यायालये.
  14. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र.
  15. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन; पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार.
  16. बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित.
  17. जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता.
  18. राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता.
  19. बुलडाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय.
  20. दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविणार.
  21. दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
  22. देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता.
  23. चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट.
  24. सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ.
  25. गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता.
  26. ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ.
  27. पाकिस्तानने पकडलेल्या मासेमारी करणाऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार.
  28. पर्यटन उपविभागासाठी उप सचिव.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा