मिरा रोड परिसरातील एका इमारतीमध्ये बकरी आणण्यावरून मोठा गोंधळ झाला. मिरा रोड पूर्वेच्या जेपी इन्फ्रा कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. मोहसीन शेख नामक व्यक्ती बकरा घेऊन जात असताना त्याला सोसायटीमध्ये बकरा घेऊन येण्यासाठी सुरक्षा रक्षकाने विरोध केला होता. त्यानंतर सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी खाली उतरत बकरा आणण्यासाठी एकत्रित विरोध केला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला बोलावलं होतं.
माहितीनुसार, मिरा रोड पूर्वेच्या जेपी इन्फ्रा कॉम्प्लेक्समध्ये मोहसीन शेख नावाची व्यक्ती सोसायटीमध्ये एक बकरा घेऊन आली होती. मोहसीन शेख यांना सोसायटीमध्ये बकरा घेऊन येऊ नका म्हणत सुरक्षा रक्षकाने विरोध केला. त्यानंतर सोसायटीमधील नागरिकांनी देखील बकरा आणण्यासाठी विरोध केला. तसेच रहिवाशांनी त्या ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण देखील सुरू केलं. घटनेची माहिती मिळताच काशिमिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रहिवासी मागणीवर ठाम असल्यामुळे वाद आणखी चिघळला. खबरदारी म्हणून पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आलं.
हे ही वाचा:
थेट यष्टिचित होऊनही बाद दिले नाही
समान नागरी कायद्यावरील मोदींच्या विधानानंतर खळबळ
मुंबई महापालिका कोविड घोटाळा: लाईफलाईन कंपनीच्या कागदांवरील डॉक्टर्स अस्तित्वातचं नाहीत!
…आणि जवळगेने विकृत तरुणाकडून कोयता खेचला, त्यामुळे तरुणी बचावली!
परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. स्थानिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर देखील या प्रकरणात अद्याप तोडगा निघालेला नाही. नागरिक आपल्या मागणीवर ठाम आहेत. संबंधित व्यक्ती मोहसीन शेख हा आमदार प्रकाश सुर्वे यांचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.