कॉमेडियन आणि प्रसिद्ध युट्युबर देवराज पटेल याचे सोमवार, २६ जून रोजी एका रस्ते अपघातात निधन झाले. देवराजच्या निधनावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. छत्तीसगडचा रहिवासी असलेल्या देवराज पटेल याचे ‘दिल से बुरा लगता है भाई प्लीज भाई’ हे वाक्य चांगलेच गाजले होते आणि त्यामुळे तो चर्चेत आला होता. रस्ते अपघातात त्याने वयाच्या २१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर देवराजचा एक जुना व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘दिल से बुरा लगता है, करोडो लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करणारे आणि सर्वांना हसवणारे देवराज पटेल आज आपल्याला सोडून गेले. या तरुण वयात एवढी प्रतिभावान व्यक्तिमत्व गमावणं खूप दुःखदायक आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती’
देवराज त्याच्या बाईकवरून जात होता. त्यांचा अपघात लाभांडी चौक परिसरात झाला. एका ट्रकने बाईकला टक्कर दिल्याने देवराज जखमी झाला त्यानंतर देवराजला आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. देवराज हा छत्तीसगडमधील महासुमंदचा रहिवासी होता.
हे ही वाचा:
कंपासमधील ब्लेडने दर्शनावर वार नंतर दगडाने मारहाण
“माझी ड्युटी संपली…”, म्हणत वैमानिकाने दिल्लीच्या प्रवाशांना जयपूरलाच सोडलं!
सूरज चव्हाणचा, सुशांत सिंग राजपूत तर होणार नाही ना?
सदावर्तेंनी केली परतफेड; ‘शरद पवार’ पॅनेलला केले पराभूत
देवराज पटेल कोण आहे?
देवराज हा महासमुंद जिल्ह्यातील दाब पाली गावचा रहिवासी होता. देवराजच्या वडिलांचे नाव घनश्याम पटेल असून ते शेती करतात. तर देवराजला एक भाऊ असून त्याचं नाव हेमंत आहे. देवराजची आई गृहिणी आहे.
देवराजने २०२१ मध्ये लोकप्रिय युट्यूबर भुवन बामसोबत ‘धिंडोरा’ या वेबसीरिजमध्ये काम केलं होतं. तसेच छत्तीसगड सरकारच्या माहितीपटातदेखील त्याने काम केलं होतं. देवराजचे इंस्टाग्रामवर ५८.४ हजार फॉलोअर्स आहेत. ‘दिल से बुरा लगता है’ या त्याच्या संवादामुळेचं तो प्रसिद्ध झाला होता.