29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषइस्लाममध्ये लिव्ह-इन निषीद्ध; संरक्षण मिळणार नाही

इस्लाममध्ये लिव्ह-इन निषीद्ध; संरक्षण मिळणार नाही

हिंदू तरुणीने दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली

Google News Follow

Related

इस्लाममध्ये ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ (स्त्री-पुरुषाचे लग्नाविना एकत्र राहणे) निषीद्ध मानले आहे असे सांगत अलाहबाद उच्च न्यायालयाने मुस्लीम तरुणासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या हिंदू तरुणीची याचिका फेटाळून लावली.

 

उच्च न्यायालयाने सांगितले की, इस्लाममध्ये लग्नापूर्वी चुंबन घेणे, स्पर्श करणे, टक लावून पाहणे यासारखे लैंगिक, वासनायुक्त कृत्य करण्यास मनाई आहे. इस्लाममध्ये याला जिना अर्थात व्यभिचार मानले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, कुराणच्या २४ व्या अध्यायानुसार, व्यभिचारासाठी अविवाहित पुरुष आणि महिलांना १०० फटके मारण्याची शिक्षा आहे. सुन्नतनुसार विवाहित स्त्री-पुरुषांना दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे. असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

 

या लिव्ह इन रिलेशनशिपवर मुलीची आई नाराज आहे, त्यानंतर दोघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे २९ वर्षीय हिंदू महिला आणि ३० वर्षीय मुस्लिम पुरुषाने संरक्षणासाठी याचिका दाखल केली होती, तरीही दोघांनी नजीकच्या भविष्यात लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली नव्हती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुस्लिम कायद्यात विवाहबाह्य सेक्सला मान्यता दिली जाऊ शकत नाही.

हे ही वाचा:

“माझी ड्युटी संपली…”, म्हणत वैमानिकाने दिल्लीच्या प्रवाशांना जयपूरलाच सोडलं!

सदावर्तेंनी केली परतफेड; ‘शरद पवार’ पॅनेलला केले पराभूत

आफ्रिकी-युरोपीय बाजारात भारताच्या व्यापाराचा वाजणार डंका

शॅम्पेन उडाल्याने पबमध्ये राडा, बाऊन्सरसह सहा जणांना अटक

लखनऊच्या हसनगंज पोलीस स्टेशन मुलीच्या आईच्या सांगण्यावरून त्यांचा छळ करत असल्याचा आरोप आंतरधर्मीय जोडप्याने त्यांच्या याचिकेत केला होता. दोघांचा धर्म भिन्न असल्याने मुलीचे कुटुंबीय त्यांचे नाते स्वीकारत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. मात्र, जर त्यांना खरोखर धोका असेल तर ते पोलिसांत एफआयआर दाखल करू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.

 

यासह, आपण सक्षम न्यायालयासमोर १५६(३) सीआरपीसी अंतर्गत अर्ज करू शकता किंवा आपण कलम २०० सीआरपीसी अंतर्गत तक्रार दाखल करण्यास देखील मोकळे आहात. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संगीता चंद्रा आणि न्यायमूर्ती नरेंद्र कुमार जोहरी यांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली, त्यानंतर न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा