ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या कष्टकरी जनसंघाने राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या कामगार संघटनेच्या पॅनलचा दणदणीत पराभव करत स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑप बँकेची निवडणूक जिंकली. सदावर्ते यांच्या पॅनलने केलेल्या या कामगिरीची चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा नेला होता. त्यावेळी या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. हे कर्मचारी तुरुंगात गेले होते. त्यानंतर या एसटी कर्मचाऱ्यांचे नेते गुणरत्ने यांना अटक झाली होती. विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सदावर्ते आणि शरद पवार यांच्यातील वाद उफाळून आला होता. पवारांवर सदावर्ते यांनी सातत्याने घणाघाती टीका केली होती. त्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व दिले जात आहे.
सदावर्ते यांनी या बँकेच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला होता. त्यात त्यांनी नथुराम गोडसेंच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून, त्यांचे फोटो वापरून वाद निर्माण केला. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. एसटी विलिनीकरणाच्या आंदोलनातून सदावर्ते यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. सदावर्ते पॅनेलला १९ जागांवर यश मिळाले.
हे ही वाचा:
कमी उंचीमुळे मुलींचा नकार येत होता म्हणून त्याने खर्च केले ६६ लाख
सूरज चव्हाणचा, सुशांत सिंग राजपूत तर होणार नाही ना?
१०० वर्षांची वृद्ध महिला पंतप्रधान मोदींना देणार १५ एकर जमीन!
दापोली हर्णे मार्गावरील अपघातात ८ ठार, नातेवाईकांना ५ लाख
१५० हून अधिक उमेदवार या निवडणुकीत उभे राहिले होते. सात पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. खरी चुरस होती ती सदावर्ते आणि शरद पवार पुरस्कृत संदीप शिंदे यांच्या पॅनेलमध्ये. गोपीचंद पडळकर यांची सेवाशक्ती संघटनाही होती. पण त्यांना यश मिळाले नाही. एसटी आंदोलनानंतर या बँकेवर कोणाची सत्ता येईल याबद्दल उत्सुकता होती. पण सदावर्ते पॅनेलने एकहाती यश मिळविले आहे.