मुंबईतून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. यासाठी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना १२० दिवस आधी आरक्षण करावे लागते. मात्र, काही क्षणात रेल्वे आरक्षण करताना प्रतीक्षा यादी हजार पार होत असल्याच्या घटनांना मध्यंतरी वाचा फुटली होती. यावरून सोशल मीडियावर रान उठलं होतं.
यंदा १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, यानिमित्ताने आधीच्या १२० दिवसांपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती. यावेळी कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजाराच्या पार गेली होती. यानंतर हा मुद्दा कोकणवासियांनी लावून धरला होता. मध्य रेल्वेकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत १६४ तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाल्याची माहिती एबीपी माझाने दिली आहे. या खात्यांच्या माध्यमातून १८१ तिकिटे काढण्यात आली.
मे महिन्याच्या १८ तारखेला प्रवाशांनी कोकणात जाण्यासाठी तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू केली असता, अवघ्या दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार झाली होती. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या एक्स्प्रेसची तिकिटे काढताना ‘रिग्रेट’ असा संदेश दाखविण्यात आला होता. काही मिनिटांत यादी हजाराच्या पार जाते म्हणजे यात काही गैरप्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. सोशल मीडियावरही लोकांनी आपले अनुभव सांगत तक्रारी केल्या होत्या.
हे ही वाचा:
महाराष्ट्र उबाठाला थेट विचारतोय… म्हणत आशिष शेलारांचे ठाकरेंना सवाल
‘भारतात भेदभावासाठी जागा नाही’
‘टायटन’ पाणबुडीवरील ते पाचजण ‘खरे शोधक’ होते
बेपत्ता टायटन पाणबुडीतील ‘त्या’ पाच जणांचा मृत्यू
यानंतर सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई करणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार १६४ बनावट खात्यांमधून १८१ तिकिटे काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.