टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांची पाहणी करण्यासाठी संशोधकांना आणि पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ‘टायटन’ पाणबुडीचा अपघात ‘कॅस्ट्रोफिक इम्पोशन’मुळे म्हणजेच स्फोटामुळे झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच त्यातील सर्वांचा मृत्यू झाला असे सांगितले जात आहे.
टायटन पाणबुडीचा शोध घेणाऱ्या बचाव पथकाला गुरुवारी सकाळी टायटॅनिक जहाजाजवळ राडारोडा आढळला होता. हा राडारोडा ‘टायटन’ पाणबुडीचा असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने कंपनीसह सर्व कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत.
या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या ओशनगेट कंपनीने या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. ‘संपूर्ण शोधक समुदायासाठी आणि समुद्रात हरवलेल्या प्रत्येक कुटुंबासाठी ही अत्यंत दुःखाची वेळ आहे,’ असे कंपनीने म्हटले आहे. अमेरिकी तटरक्षक दलाचे ऍडमिरल जॉन मॅगर यांनी या शोधावर प्रकाश टाकला. टायटॅनिकच्या अवशेषांजवळ आढळलेला राडारोडा हा पाणबुडीचा असल्याने तिचा अपघात झाल्याचे स्पष्ट होत आहे. हा स्फोट नेमका कसा घडला हे गूढच असले तरी काही तज्ज्ञांच्या मते ‘कॅस्ट्रोफिक इम्पोशन’मुळे हा अपघात घडला असावा.
हे ही वाचा:
टायटॅनिकच्या जवळ सापडले दोन अवशेष; ते टायटनचे आहेत का याचा शोध
लाचखोर आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड निलंबित
पाटण्यात पुन्हा मोदीविरोधाचे महागठबंधन
‘कॅस्ट्रोफिक इम्पोशन’ म्हणजे काय?
कॅस्ट्रोफिक इम्पोशन’ म्हणजे जोरदार अंतर्गत दाबामुळे स्फोट होऊन जहाज कोसळणे किंवा निकामी होणे. जेव्हा एखाद्या मर्यादित जागेतील दबाव वाढत जातो आणि एका क्षणाला हा दाब संपूर्ण जहाज सहन करू शकत नाही. हा दाब मर्यादेपलीकडे गेल्यामुळे मोठा स्फोट होतो. यालाच ‘कॅस्ट्रोफिक इम्पोशन’ म्हटले जाते.