30 C
Mumbai
Monday, December 2, 2024
घरक्राईमनामालाचखोर आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड निलंबित

लाचखोर आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड निलंबित

पुणे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानंतर राज्य सरकारची कारवाई

Google News Follow

Related

पुणे येथील अपर विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्यावर सीबीआयने ९ जून रोजी मोठी कारवाई केली होती. लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली होती. सीबीआयने छापा टाकला होता. या छाप्यात ८ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात रामोड यांना अटक करण्यात आली होती.

सीबीआयने अटक केल्यानंतर अनिल रामोड यांना सीबीआय कोठडी सुनावण्यात आली होती. १३ जून रोजी सीबीआय कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. त्यांचा जामीन अर्ज नामंजूर झाला आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्तालयाने राज्य सरकारला आयएएस अधिकारी अनिल रामोड यांच्या संदर्भात अहवाल पाठवला होता. अहवालानुसार, लाचखोर अनिल रामोड यांना निलंबित करण्यात यावं, अशी शिफारस करण्यात आली होती. त्या प्रस्तावावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले असून अनिल रामोड यांना निलंबित केले आहे. यासंदर्भातील आदेश विभागीय आयुक्तालयाला देण्यात आले आहेत.

रामोड हे ४८ तासापेक्षा पोलिस कोठडीत होते. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. या निलंबन कालावधीत त्यांनी पुणे मुख्यालय सोडू नये, इतर खासगी नोकरी किंवा व्यवसाय करू नये. पुण्याबाहेर जाताना विभागीय आयुक्तांच्या परवानगी शिवाय जाऊ नये, असे अनिल रामोड याच्यासंदर्भात राज्य सरकारने पाठवलेल्या आदेशात आदेशात म्हटले आहे.

हे ही वाचा:

आदिपुरुषची घसरण थांबता थांबेना!

‘मातोश्री’जवळील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेचा बुलडोझर

…आणि अमूल गर्ल पोरकी झाली!

अजित पवार बाटली का फिरवत होते कळलं का?

काय होते प्रकरण?

डॉ. अनिल रामोड यांनी एका शेतकऱ्याकडून भूसंपादनचा मोबदला वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी दहा लाखांची लाच मागितली होती. शेतकऱ्याने यासंदर्भात सीबीआयकडे तक्रार केली गेली होती. त्यानंतर सीबीआयने ८ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रामोड यांना अटक केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
204,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा