25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणपालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात महापालिकेवर १ जुलैला मोर्चा

पालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात महापालिकेवर १ जुलैला मोर्चा

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेतून घोषणा

Google News Follow

Related

ठाकरे गट १ जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व आदित्य ठाकरे करणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत ठाकरे गटातील माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई महानगर पालिकेच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी ठाकरे गट हा मोर्चा काढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पावसाप्रमाणे निवडणुका सुद्धा लांबणीवर जात आहेत. लोकांची काम करायची कशी? असा प्रश्न पडतोय. मुंबईकरांचा पैसा उधळला जातोय, वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मुंबईला मायबाप कोणी राहिला नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच या भ्रष्टाचाराविरोधात मुंबई महापालिकेवर १ जुलैला आम्ही मोर्चा काढू. आदित्य ठाकरे या मोर्च्याचं नेतृत्व करतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महापालिकेच्या कामाची एसआयटी चौकशी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. कुठेही भ्रष्टाचार आमच्या काळात झालेला नाही. आज जागतिक गद्दार दिनाची मागणी केली आहे, त्यामुळे तो दिन साजरा केला जाणार. त्यांना एसआयटी स्थापन करून कोंडी करायचं तर करू देत. भ्रष्टाचार कोण करतंय? हे आम्ही समोर आणतो आहोत. अनेक प्रकल्पात कसा भ्रष्टाचार होतोय? रस्ते घोटाळा खडी घोटाळा तो समोर आणला आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

हे ही वाचा:

ठरलं! या दिवशी श्री राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार

फाल्कन्सनी पटकावले मुंबई प्रीमियर लीग टेबलटेनिसचे विजेतेपद

ठाकरेंच्या अडचणी वाढणार, कॅगच्या अहवालानंतर एसआयटीची स्थापना

टायटॅनिकचे भग्नावशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बेपत्ता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अर्धवटराव असा केला होता. त्याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. मी अर्धवटराव, तर ते काय आवडाबाई आहेत का? सध्या देवेंद्र फडणवीस हे ना-आवडाबाई झाले आहेत, असा टोमणा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा