23 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषरोहितचा उत्तराधिकारी म्हणून कुणालाही तयार केले नाही!

रोहितचा उत्तराधिकारी म्हणून कुणालाही तयार केले नाही!

दिलीप वेंगसरकर यांचा बीसीसीआयवर प्रहार

Google News Follow

Related

भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय क्रिकेट बोर्डावर (बीसीसीआय) टीका केली आहे. तसेच, आयपीएलमधून पैसे कमावणे, हेच मोठे यश नाही, असे सांगत आयपीएललाही लक्ष्य केले आहे.   वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यापासून भारतीय संघ आणि व्यवस्थापनावर टीका होत आहे. रोहित शर्माला कसोटी सामन्यात कर्णधारपद द्यावे, अशी मागणी अनेकांनी केली आहे. अर्थात, यात सध्या तरी काही बदल होईल, असे दिसत नाही. मात्र त्याचवेळी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बीसीसीआयवर टीका केली आहे.

भारतीय संघाने सन २०१३मध्ये शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. तेव्हा एमएस धोनी कर्णधार होता. त्यानंतर ना धोनी, ना विराट कोहली किंवा रोहित शर्माचा संघ आयसीसी ट्रॉफी जिंकू शकला. त्यामुळे सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डावर टीका होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत दिलीप वेंगसरकर यांनी काही महत्त्वाच्या बाबींवर लक्ष वेधले.

‘रोहित शर्मा आता कर्णधार आहे. मात्र संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने रोहितचा उत्तराधिकारी म्हणून कोणत्याही आदर्श उमेदवाराला तयार केले नाही. हे अपयश आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे गेल्या सहा-सात वर्षांत मी ज्या निवड समितीच्या सदस्यांना पाहिले, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे ना त्यांच्यात दृष्टिकोन आहे, ना त्यांना खेळाबाबत खोल माहिती आहे आणि ना त्यांना क्रिकेटबाबत काही समजते,’ अशी टीका वेंगसरकर यांनी केली.

हे ही वाचा:

ठरलं! या दिवशी श्री राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार

फाल्कन्सनी पटकावले मुंबई प्रीमियर लीग टेबलटेनिसचे विजेतेपद

ठाकरेंच्या अडचणी वाढणार, कॅगच्या अहवालानंतर एसआयटीची स्थापना

टायटॅनिकचे भग्नावशेष पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी बेपत्ता

‘निवड समितीने पाठोपाठच्या दौऱ्यांमुळे आणि मुख्य खेळाडूंच्या अनुपस्थित शिखर धवनला भारताचा कर्णधार बनवले होते. इथेच तुम्ही भविष्यातील कर्णधाराला तयार करू शकला असता,’ असे ते म्हणाले. वेंगसरकर यांनी संघ व्यवस्थापनावरही ताशेरे ओढले. ‘तुम्ही कोणालाच तयार केले नाही. तुम्ही जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून शेखी मिरवता. परंतु ती ताकद खेळात दिसत नाही. केवळ आयपीएल असणे, प्रसारण हक्कांतून कोट्यवधी रुपयांची कमाई करणे, हीच केवळ मोठी बाब असता कामा नये,’ असे वेंगसरकर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा